क्षयाच्या रुग्णावर उपचार करण्यापूर्वी या रोगाचे निदान होणे गरजेचे आहे. मात्र निदान वेळेवर होत नसल्याने अशा रुग्णावर वेळीच उपचार होत नाही आणि ज्यावेळी निदान होते, त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. अमेरिकी शास्त्रज्ञांनी अशी रक्तचाचणी शोधून काढली आहे, ज्यामुळे काही तासांतच क्षयरोगाचे निदान होऊ शकते.

जगभरातील अनेक लोक क्षयरोगग्रस्त आहेत. वेळीच निदान न झाल्याने अशा रुग्णांना उपचार मिळत नाहीत. त्याशिवाय निदान न झाल्याने क्षयग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्याने अनेकांना क्षयाचा संसर्ग होऊ शकतो. क्षयरोगाचे निराकरण करण्यासाठी अनेक देश पुढाकार घेत आहेत, अमेरिका तर त्यांच्या देशातील क्षयरोगाच्या निराकरणासाठी आणि रुग्णाला योग्य उपचार करता यावे यासाठी तब्बल ६६० कोटी डॉलर खर्च करत आहेत.

printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
gut health diet
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

क्षयरोगाचे निदान होण्यासाठी अनेक चाचण्यांना सामोरे जावे लागते. थुंकी, रक्त यांची चाचणी, फुफ्फुसाची चाचणी, लायम्फ बायोप्साइस, स्पिनल टॅप्स अशा अनेक चाचण्या केल्यानंतर रुग्णाला क्षयरोग आहे की नाही याचे निदान होते. यासाठी काही दिवस किंवा आठवडेही जातात. त्याशिवाय या चाचण्यांमधून योग्य निदान होतचे असे नाही. त्यामुळे अ‍ॅरिझोना विद्यापीठाच्या संशोधकांनी एक विशेष रक्तचाचणी शोधून काढली असून त्यामुळे काही तासांमध्येच रुग्णाला क्षय आहे की नाही, याचे निदान होऊ शकते, असे या संशोधकांपैकी एक असलेल्या टोनी हू यांनी सांगितले.