आपण किती धाकाधकीचे आयुष्य जगतो ना! आयुष्यच जणू घडाळ्याच्या काट्याला जोडलं असतं. रोजची पळापाळ असतेच पण त्याचबरोबर अनेक छोट्या मोठ्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते, वाढती लोकसंख्या भ्रष्ट कारभार, ना चांगले रस्ते, ना व्यवस्था, कुठे वीजच नाही तर कुठे वाहतूकीची सोय नाही, कुठे पाणी नाही तर तर कुठे वैद्यकिय सेवाच नाही, मोजायचं झालंच तर समस्यांचा डोंगरच समोर उभा राहिल. त्यामुळे अनेकदा असं वाटतं आपण कुठे तरी अशा ठिकाणी राहावं जिथे आपल्याला चांगलं आयुष्य जगता येईल, या समस्यांचा गंधही त्या जगण्याला नसेल. पण असं आयुष्य असणा-या जागा खरंच अस्तित्त्वात आहेत का? असा प्रश्न आपल्यालाही पडला असेल. पण या जगात असेही काही देश आहेत जिथे राहणं कधीही उत्तम. युनायटेड नेशन्सने अॅन्यूअल डेव्हलपमेंट रिपोर्ट सादर केला. यात जगातील अशा देशांची यादी  दिली आहे जिथे राहणं म्हणजे स्वर्गलोकाइतकेच सुखी असल्याचे म्हटले आहे.

१. नॉर्वे : या यादीत पहिलं नाव आहे ते नॉर्वे या देशाचं. राहण्याच्या दृष्टीने जगातील सर्वोत्तम देश नॉर्वे असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे सलग १३ वेळा या देशाने हा मान मिळवला आहे. नागरिकांच्या आरोग्यापासून ते शिक्षणापर्यंत सगळ्याच गोष्टींवर येथे भर दिला जातो त्यामुळे सर्व सुखसोयींवर भर देणारा हा देश राहणीमानाच्या दृष्टीने सर्वोत्कृष्ट देश आहे.

international monetary fund praises india for maintaining fiscal discipline in election year
निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार
mumbai high court on sawantwadi dodamarg wildlife corridor
विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?

sognefjord-norway
२. ऑस्ट्रेलिया : दुसरा क्रमांक पटकवला आहे तो ऑस्ट्रेलियाने, साहजिकच विकसित देशांच्या यादीत या देशाची गणना होते, शिवाय शिक्षण व्यवस्थेवरही इथे जास्त भर दिला जातो, त्यामुळे साक्षरतेचे प्रमाण इथे अधिक आहे. गेल्या वीस वर्षांत शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी या देशाची निवड करतात.

australia-wallpaper-1
३. स्विर्त्झलँड : अनेक बॉलीवूड चित्रपटातून या देशाचे दर्शन आपल्याला होते, त्यामुळे तसा आपल्या परिचयाचा हा देश. जितका सुंदर आणि स्वच्छ आहे तितकेच तिथे जगणेही अधिक सुखकारक असल्याचे म्हटले आहे.

४ . जर्मनी : हिटरलचा नाझीवाद, दुसरं महायुद्ध आणि ज्यूंचा नरसंहार अशा अनेक वाईट गोष्टी या देशांने पाहिल्या. पण या सगळ्यातून धडा घेत उभी राहिली ती नवी जर्मनी. अंधा-या भविष्यातून बाहेर येत या देशांने नागरिकांच्या राहणीमान आणि त्यांच्या मुलभूत सुविधांकडे अधिक लक्ष केंद्रित केलं म्हणूनच या यादीत जर्मनी चौथ्या क्रमांकावर आहे.

(छाया सौजन्य : सीटीस्कायलाइन )
(छाया सौजन्य : सीटीस्कायलाइन )

 

५. डेन्मार्क : युएनच्या यादीत पाचव्या क्रमांवर आहे डेन्मार्क. स्त्री पुरुष समानता फक्त कागदापुरता किंवा बोलण्यापुरता नाही तर प्रत्यक्षातही इथे दिसते. येथे प्रत्येक क्षेत्रात पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करतात आणि त्याबदल्यात त्यांना मिळणारा मोबदलाही पुरुषांना मिळणा-या मोबदल्या इतकाच समान असतो. या व्यतिरिक्त सर्वोत्कृष्ट राहणीमानाच्या यादीत सिंगापूर, नेदरलँड, आर्यलँड, आईसलँड, कॅनडा या पाच देशांचाही समावेश आहे.

(छाया सौजन्य : शटरस्टॉक)
(छाया सौजन्य : शटरस्टॉक)