रिलायन्स जिओने सुरुवातीला आपल्या ग्राहकांना मोफत इंटरनेट सुविधा देत धमाका उडवून दिला होता. नुकताच काही दिवसांपूर्वी जिओने मोफत ४ जी मोबाईल फोन देण्याचीही घोषणा केली. जिओच्या या ऑफर्सचा फटका बाजारातील इतर कंपन्यांना बसत असल्याने जिओच्या ऑफर्सला टक्कर देत कंपन्या आपले नवनवीन प्लॅन्स जाहीर करत आहेत. नुकतिच व्होडाफोन कंपनीने अशीच एक घोषणा केली असून तुम्ही जर व्होडाफोन ग्राहक असाल तर तुम्ही ही नवी योजना ऐकून नक्कीच खूश व्हाल.

तर देशातील दुसरी मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून ओळखला जाणाऱ्या व्होडाफोनतर्फे ग्राहकांना ४ जीचा ७० जीबीचा डेटा प्लॅन देण्यात येणार आहे. हा प्लॅन केवळ २४४ रुपयांना असून ७० दिवस प्रत्येक दिवशी १ जीबी इतका डेटा ग्राहक वापरु शकणार आहेत. हाय स्पिड डेटाबरोबरच अनलिमिटेड कॉलिंगचीही सुविधा देण्यात आली आहे.

जिओचा ४जी फोन खरेदी करताय? मग ‘या’ गोष्टी लक्षात घ्या

मात्र व्होडाफोनच्या नवीन ग्राहकांनाच हा लाभ घेता येणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. या ऑफर अंतर्गत नव्याने प्लॅन घेणाऱ्या ग्राहकांना ७० दिवसांऐवजी ३५ दिवसांचीच व्हॅलिडिटी मिळणार आहे. तर दुसरीकडे रिलायन्स जिओतर्फे ३०९ रुपयांच्या प्लॅनमध्ये केवळ ५६ दिवसांत रोज १ जीबी इतका डेटा ४ जी स्पिडने वापरता येणार आहे. याशिवाय जिओने अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा दिली आहे. याशिवाय जिओने ८४ दिवस व्हॅलिडिटी असलेला ३९९ चा प्लॅनही दिला आहे.