अक्रोडमध्ये कॅलरी जास्त असल्याने वजन वाढेल की काय या भीतीने अनेक जण अक्रोडचे सेवन करणे टाळतात. अनेकांना अक्रोड आवडत असतो, पण केवळ वजन वाढण्याच्या भीतीमुळे ते अक्रोडपासून दूर राहतात. मात्र एका नव्या संशोधनानुसार अक्रोडमध्ये २१ टक्के कमी कॅलरीज असतात, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे अक्रोड नियमित खाणे फायदेशीर आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने नुकतेच अक्रोडमध्ये भरपूर कॅलरी असतात, असे सांगितले होते. मात्र संशोधकांनी त्यांचा हा मुद्दा खोडून काढला. कृषी विभागाने अक्रोडमध्ये १८५१ कॅलरीज असतात, असे सांगितले होते. मात्र अक्रोडमध्ये यापेक्षा २१ टक्के म्हणजे १४६ कॅलरीज असतात, असे संशोधकांनी सांगितले आहे. अक्रोडमुळे वजन वाढत नाही, तर शरीराला अधिक ऊर्जा मिळते, असे या संशोधकांचे प्रमुख डॉ. डेव्हिड जे. बेअर यांनी सांगितले. त्यामुळे अक्रोड खाणे शरीरासाठी फायदेशीर असल्याचे ते म्हणाले. हे संशोधन ‘जनरल ऑफ न्युट्रिशन’ या नियतकालिकेमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)