नियमितपणे क्रेडिट कार्ड वापरणारे सध्या अनेक जण आहेत. नोटाबंदीनंतर तर या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसते. मात्र क्रेडिट कार्डने केला जाणारा व्यवहार एकाएकी नाकारला जाऊ शकतो. असे झाल्यास आपल्याला त्यामागील कारणे माहिती असणे आवश्यक आहे. क्रेडिट कार्ड ही एक गरज झाली आहे, याचे कारण म्हणजे त्यामुळे आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळते. आपली खर्च करण्याची क्षमता आपल्या मासिक उत्पन्नावर अवलंबून असते आणि क्रेडिट कार्डने आपण ती क्षमता काही काळासाठी वाढवू शकतो. आपल्याला अवचित खरेदी करण्यासाठी, तिकीट बुकिंगसाठी, बाहेर जेवण्यासाठी पैशाची गरज असताना क्रेडिट कार्ड आपल्या मदतीला धावून येते. मात्र एखाद्या महत्वपूर्ण आर्थिक व्यवहारादरम्यान अचानक हे साधन काम करेनासे झाल्यावर आपली अवस्था मेल्याहून मेल्यासारखी होते. कल्पना करा एखाद्या हॉटेलात तुम्ही सहकुटुंब जेवायला गेला आहात आणि त्या आनंदावर विरजण टाकायला क्रेडिट कार्डने केलेला व्यवहार नाकारला जातो. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीच्या वाढदिवसासाठी ऑनलाइन फुलांची खरेदी करीत असताना तुमचे क्रेडिट कार्ड ब्लॉक केले जाते. त्यामुळे आपले कार्ड सुजाणपणे वापरा आणि व्यवहार नाकारला जाण्याची शक्यता टाळण्यासाठी खबरदारी घ्या. काय आहेत हे व्यवहार नाकारले जाण्याची कारणे समजून घेऊया…

१. अचानकपणे होणारे परदेशातील व्यवहार

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
When can my baby drink cow’s milk
सहा महिने की बारा महिने, बाळाला गायीचे दूध केव्हा देऊ शकता? WHO चे नवे मार्गदर्शक तत्व काय सांगतात? जाणून घ्या

जगभरात क्रेडिट कार्डच्या फसवणुकीचे प्रमाण वाढत असल्यामुळे आजकाल बँका तुमच्या क्रेडिट कार्ड व्यवहारांवर सुरक्षेसाठी अधिक लक्ष ठेवतात. मात्र बँकांचे लक्ष चुकविण्यासाठी काही लोक क्रेडिट कार्डाच्या माहितीची चोरी करून वेगवेगळ्या देशातून ऑनलाइन खरेदी करीत असत. त्यासाठी आता बँका परदेशातील व्यवहार अचानकपणे आढळून आल्यास त्याला ब्लॉक करू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या परदेश प्रवासाची कल्पना क्रेडिट कार्ड कंपनीला देणे आवश्यक असते.

२. तांत्रिक अडचणी

कधीकधी क्रेडिट कार्ड ब्लॉक होणे ही तात्पुरती बाब असू शकते. बँकेची वेबसाइट अपग्रेड होत असल्यास किंवा आपण ज्या ठिकाणी खरेदी करतो त्या ठिकाणच्या क्रेडिट कार्ड मशीनमध्ये काही तांत्रिक अडचण असू शकते. अशा प्रकारे अनेक ऑनलाइन पोर्टल्सवरही क्रेडिट कार्ड व्यवहार नाकारला जाऊ शकतो. क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँकेच्या सर्व्हरवर किंवा व्यावसायिकाच्या बँकेमध्ये तांत्रिक अडचण असली, तर ती माहीत करून घेतल्यास आपला त्रास कमी होऊ शकतो.

आर्थिक गणिते सांभाळताना ‘या’ चुका टाळा

३. अद्ययावत अटी व शर्तींची मंजुरी नसणे

क्रेडिट कार्ड वापरण्याच्या अटी व शर्ती बँकांकडून केव्हाही बदलल्या जाऊ शकतात. अटी व शर्तींमधील बदल बँका साधारणपणे सर्व कार्डधारकांना मेल किंवा एसएमएस द्वारे कळवतात. जर तुम्ही बँकेच्या अशा निरोपांकडे दुर्लक्ष करीत असाल आणि बदललेल्या अटी व शर्तींना मंजुरी दिलेली नसेल, तर तुमचे कार्ड ब्लॉक केले जाऊ शकते. अशी परिस्थिती टाळण्यासाठी बँकेकडून आलेले सर्व ईमेल्स वाचावेत.

४. अनपेक्षित खरेदी

बँकांनी कार्ड ब्लॉक करण्याचे एक आणखी कारण म्हणजे अचानकपणे केलेली जास्तीची खरेदी. तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करुन नियमितपणे ठराविक रकमेची खरेदी करत असाल आणि अचानक जास्त खरेदी केल्यास ती तुमच्या सरासरी इतिहासापेक्षा वेगळी असल्याने ब्लॉक होते. कार्ड अशा कारणासाठी ब्लॉक करणे प्रतिबंधात्मक असते आणि कार्डापासून होणाऱ्या फसवणुकी थांबवण्यासाठी असे केले जाते.

५. चुकीची माहिती

कार्डाचा वापर करत असताना चुकीचा पिन क्रमांक किंवा सीव्हीव्ही क्रमांक वारंवार देणे यामुळेही तुमचे कार्ड ब्लॉक केले जाऊ शकते. असे होऊ नये यासाठी आपल्या कार्डचा पिन आणि सीव्हीव्ही क्रमांक पाठ करून ठेवा. काही जुन्या कार्डांवरील क्रमांक अधिक वापराने पुसले जाऊ शकतात. कार्ड जुने झाल्यावर बँकेकडून दुसरे कार्ड करून घेण्याची खबरदारी घ्या.

– आदिल शेट्टी,

सीईओ, बँकबझार