काँग्रेसचे स्थानिक ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आनंदराव देवकते यांनी पक्षाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात देवकते यांचे भाचे तथा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे देवकते यांनीही राष्ट्रवादीत जाणे पसंद  केले आहे. त्यामुळे काँग्रेसला धक्का बसला आहे.
दक्षिण सोलापूरमधून देवकते हे १९७८ सालापासून २५ वर्षे विधानसभेवर प्रतिनिधित्व केले होते. १९९२-९३ साली तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या विरोधात पक्षांतर्गत झालेल्या उठावात स्वत: शंकरराव चव्हाणनिष्ठ असूनदेखील देवकते यांनी आक्रमक भूमिका बजावली होती. १९९९ ते २००३ या कालावधीत त्यांनी दुग्धविकास व पशुसंवर्धन खात्याचे कॅबिनेट मंत्रिपदही सांभाळले होते. नंतर ‘महानंदा’चे अध्यक्षपदही भूषविले होते. २००३ साली सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री झाले. तेव्हा देवकते यांनी शिंदे यांच्यासाठी आमदारकी सोडली होती. नंतर सोलापूर लोकसभा पोटनिवडणुकीत देवकते यांना काँग्रेसने संधी दिली असता त्यांचा पराभव झाला होता. तेव्हापासून देवकते यांची राजकीय पिछेहाट होत गेली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील पाण्याच्या प्रश्नावर शासनाने उदासीनता दाखवली असून पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण राष्ट्रवादीत गेल्याचे देवकते यांनी सांगितले. जिल्ह्य़ात आपण खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

Deputy Chief Minister Ajit Pawar also applied for Lok Sabha from Baramati
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही बारामतीतून लोकसभेसाठी अर्ज… झाले काय?
Vishal Patil filed two separate candidatures as Congress and Independent in sangli
सांगलीत विशाल पाटलांचे काँग्रेस व अपक्ष म्हणून दोन स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल
Yashwant Sena, Sanjay Kshirsagar
मोहोळमध्ये बलाढ्य राष्ट्रवादीशी झुंज देणारे संजय क्षीरसागर भाजपकडून बेदखल, यशवंत सेनेकडून उमेदवारी
Suresh taware, NCP,
मविआत निर्णय होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने केला उमेदवार जाहीर, काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांचा आरोप