आठ दिवसांपूर्वी विवाह झालेल्या एका २७ वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार केकतपांगरी (ता. गेवराई, जि. बीड) येथे मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास समोर आला. सिद्धेश्वर बाबुराव शिंदे असे मृत व्यक्तीचे नाव असून आत्महत्येमागचे कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा नोंद झाला नव्हता.

सिद्धेश्वरने आज सकाळी १० च्या सुमारास विषारी द्रव्य प्राशन केले. त्याने विष घेतल्याचे लक्षात आल्यानंतर लगेचच त्याला उपचारासाठी गेवराई येथील उपजिल्हा रूग्णालयात नेले. परंतु, तो गंभीर असल्याने त्याला बीड जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तो शेतीकाम करत असत. विशेष म्हणजे याच महिन्यात दि. १६ मे रोजी त्याचा विवाह झाला होता. कोणत्या कारणामुळे त्याने आत्महत्या केली, हे अद्याप समजू शकलेले नाही.

Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
A youth from Nalasopara committed suicide by consuming poison due to cyber fraud
सायबर भामट्यांनी घातला २ लाखांचा गंडा; वडील रागावतील म्हणून मुलाची आत्महत्या
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या