निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील व निवृत्त पोलीस महानिरीक्षक एस. एम.मुश्रीफ यांना पोलीस संरक्षण मिळावे या मागणीचे निवेदन अखिल भारतीय नौजवान सभेच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक रीतेशकुमार यांना देण्यात आले. पोलीस संरक्षण न दिल्यास ए. आय. एस. एफ व ए. आय. वाय. एफ.चे रेड गार्ड्स आपले शिक्षण व रोजगार सोडून कोळसे पाटील व मुश्रीफ यांना संरक्षण देतील असा इशाराही या वेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला.
कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे ३० डिसेंबर रोजी ‘हू किल्ड करकरे’ या कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ नेते गोिवद पानसरे यांनी केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. जी. कोळसे पाटील होते, तर एस. एम. मुश्रीफ लिखित पुस्तकावर या वेळी चर्चा होणार होती. यानंतर दीड महिन्यातच गोिवद पानसरे यांचा खून करण्यात आला. यामुळे मुश्रीफ व बी. जी. कोळसे पाटील यांच्याही जीवितास धोका होऊ शकतो त्यामुळे त्यांनाही पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली.