जिल्ह्य़ातील सेनगाव बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी रविवारी (दि. ३०) मतदान होणार आहे. निवडणूक मदानात आजी-माजी आमदारांचे दोन गट उतरले असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप-काँग्रेस ही अभद्र युती असल्याचा आरोप माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर यांनी केला, तर आरोप करणाऱ्यांनी आधी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला बाजार समितीचे माजी सभापती नारायण खेडकर यांनी उत्तरादाखल दिला.
लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर दोन महिन्यांपूर्वी िहगोली बाजार समिती निवडणुकीतून सर्वसामान्यांना पुढाऱ्यांच्या बदलत्या राजकीय भूमिकेचे चित्र पाहावयास मिळाले. लोकसभेत एका पक्षाचा प्रचार करणाऱ्या मंडळींनी विधानसभेच्या निवडणुकीत वेगळा निर्णय घेतला. िहगोली बाजार समिती निवडणुकीत मात्र सत्ता मिळवण्यासाठी नेते काय करतात, याचे चित्र उघड झाले आहे. िहगोली बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, शेतकरी संघटना व मनसे एकत्र आले. त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना धूळ चारून आपली सत्ता कायम राखली. राष्ट्रवादीचे माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर, शिवसेनेचे रामेश्वर िशदे, भाजपचे विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे, शेतकरी संघटनेचे उत्तमराव वाबळे ही मंडळी िहगोली बाजार समितीत सत्तेवर आहेत.
आता सेनगाव बाजार समिती संचालकांच्या १८ जागांसाठी रविवारी मतदान होणार आहे. निवडणूक मदानात ४७ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. सेवा सोसायटी मतदारसंघात ५६८, ग्रामपंचायत मतदारसंघात ४९६, व्यापारी मतदारसंघात ५२, तर हमाल मापारी मतदारसंघात १५८ असे एकूण १ हजार २७४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सेनगाव बाजार समितीत पूर्वी राष्ट्रवादीचे माजी आमदार गोरेगावकर, शिवसेनेचे दिनकरराव देशमुख यांच्या गटाची सत्ता होती. सत्तेत भाजप पदाधिकारीही सामील होते.
िहगोली बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसच्या गटाविरुद्ध एकत्र असलेल्या राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना युतीच्या पुढाऱ्यांनी वेगवेगळी वाट धरली. सेनगाव बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस, भाजपचे कार्यकत्रे एकत्र आले असून त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी, शिवसेना व मनसे यांचा गट मदानात उतरला आहे.
शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचाराचा नारळ माजी आमदार गोरेगावकर यांच्या हस्ते वाढविण्यात आला. सत्तेसाठी विचाराचा त्याग करून भाजपने सेनगाव बाजार समितीत केलेली युती अविचारी आहे. सत्तेच्या स्वार्थासाठी आमदार मुटकुळे भूमिका बदलत आहेत. भाजप-काँग्रेसची अभद्र युती झाल्याचा आरोप गोरेगावकर यांनी या वेळी बोलताना केला. या आरोपाचे खंडन करताना माजी सभापती नारायण खेडकर यांनी भाजप-काँग्रेसची अभद्र युती असल्याचा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे. पूर्वी त्यांनी पंजा, सायकल, हत्ती या चिन्हांवर निवडणुका लढविल्या. िहगोली बाजार समितीवर १० वर्षे ज्यांच्यासोबत सत्ता भोगली, दोन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत त्यांचा भाजपसोबत घरोबा होता त्याचा विसर कसा पडला? अभद्र युतीचा आरोप करणाऱ्यांनी प्रथम आपण कुठे आहोत, याचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला पत्रकारांशी बोलताना दिला.
दरम्यान, या निवडणुकीत लावलेल्या प्रचार फलकावरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसे युतीच्या शेतकरी सहकारी विकास पॅनेलच्या बॅनरवर माजी आमदार गोरेगावकर, शिवसेनेचे रामेश्वर िशदे, मनसेचे बंडू कुटे व काँग्रेस खासदार राजीव सातव, आमदार टारफे यांचे छायाचित्र आहे, तर आमदार मुटकुळे व नारायण खेडकर यांच्या परिवर्तन पॅनेलच्या फलकावर गोरेगावकर, सातव व मुटकुळे यांचे छायाचित्र असल्याने नेमके कोण कोणासोबत अशा संभ्रमात मतदार असले तरी सातव यांचे छायाचित्र दोन्ही पॅनेलच्या प्रचार प्रसिद्धी फलकावर झळकत असल्याने या फलकावरून एकमेकांच्या युतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.