गुहागरमधील कासवमित्र विश्वास खरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे बुधवारी उघडकीस आले. त्यांचा मृतदेह गुहागरमधील समुद्र किनाऱयावर आढळून आला. अंगावरील सोने चोरण्यासाठी त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे. विश्वास खरे यांच्या हत्येने प्राणीमित्र कार्यकर्त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
विश्वास खरे यांना अंगावर सोन्याचे दागिने घालण्याची आवड होती. हेच दागिने चोरून नेण्यासाठीच त्यांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला. गेल्या साडेचार वर्षांपासून विश्वास खरे गुहागरमध्ये कासवांसाठी काम करीत आहेत. जानेवारीत कासवांचा विणीचा हंगाम सुरू होतो. ऑलिव्ह रिडले या प्रजातीची कासवे कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येतात. पण कुत्रे किंवा माणसांकडून अंडी पळवली जातात. या स्थितीत विश्वास खरे कासविणीने अंडी घातलेली जागा संरक्षित करण्याचे काम करीत होते. याच ठिकाणी ते कासव महोत्सवही भरवत होते.

Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Narayan Rane case, Vinayak Raut, Parab,
२००५ नारायण राणेंच्या सभेतील गोंधळाचे प्रकरण : विनायक राऊत, परब, सावंत, देसाई, रवींद्र वायकर यांची निर्दोष सुटका
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा