छेडछाड रोखण्यासाठी दामिनी पथक सज्ज

आदिशक्तीचा जागर अर्थात नवरात्रोत्सव शनिवारपासून सुरू होत आहे. या काळात होणारे तरुणी व महिलांच्या छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी रायगड पोलिसांचे दामिनी पथक सज्ज झाले आहे. अन्य पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनाही या पथकाच्या मदतीसाठी तनात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रमुख मंडळांना सीसीटीव्ही लावण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.

Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
Do not come to ask for votes placards from onion growers in Malwadi
मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक
Techie doubles his income
वर्षाला १ कोटी रुपये कमावण्यासाठी व्यक्तीने शोधला जुगाड, लाखोंचे शैक्षणिक कर्जही फेडलं, एकाच वेळी केल्या….
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग

गणेशोत्सव संपताच सारे पुन्हा नवरात्रोत्सवाच्या तयारीला लागले आहेत. शनिवारी १ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. नऊ दिवसांच्या कालावधीत सर्वत्र आदिशक्तीचा जागर होणार आहे. यानिमित्ताने तरुणाईच्या आवडीचा गरबा आणि दांडिया रासही रंगणार आहे. नवरात्रोत्सव म्हणजे ज्येष्ठ मंडळीपासून बच्चे कंपनीच्या आवडीचा सण आहे. त्यात तरुणाईसाठी एक पर्वणी म्हणून हा सण ठरला आहे. सर्वस्तरातील व्यक्ती एकत्र येऊन आनंदमय व भक्तिमय वातावरणात हा सण साजरा करतात. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातदेखील मोठय़ा प्रमाणात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा आदी विविध कार्यक्रमही या कालावधीत राबविले जातात. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रायगड पोलिसांनी खास खबरदारी घेतली आहे. वेगवेगळ्या स्तरावर पोलीस पाटील, नवरात्रोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बठका घेऊन स्वयंसेवक नेमणे, सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, लाइटची सुविधा ठेवणे, कोणताही गरप्रकार घडू नये म्हणून स्वयंसेवक ठेवणे अशा अनेक प्रकारच्या सूचनाही देण्यात आल्या असून सण शांततेत व आनंदात साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सवाच्या कालावधीत गरबा, दांडिया रास असे अनेक कार्यक्रम राबविले जातात. जिल्ह्य़ातील महत्त्वाच्या मंदिर, नवरात्रोत्सव मंडळाच्या ठिकाणी गर्दीमध्ये महिला, तरुणींची छेडछाड करण्याचे प्रकार घडत असतात. ही बाब लक्षात घेऊन रायगड पोलीस दलामार्फत बीट मार्शल, दामिनी पथक तनात असणार आहे याशिवाय गोपनीय यंत्रणा, साध्या वेशातील पोलिसही बंदोबस्तासाठी सज्ज असणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांनी दिली. या वर्षी रायगड पोलिसांच्या हद्दीत देवींच्या १ हजार १३७ सार्वजनिक तर १७७ खासगी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. १६९ सार्वजनिक तर १ हजार २०२ खासगी घटस्थापना होईल. १८० सार्वजनिक तर १८ खासगी ठिकाणी देवीच्या फोटोंची स्थापना करण्यात येणार आहे.