कोल्हापूरच्या महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हसिना बाबू फरास तर उपमहापौरपदी अर्जुन आनंद माने यांची निवड झाली. मुस्लिम महिलेला महापौर पदाचा मान मिळण्याची कोल्हापूरच्या राजकीय इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. फरास यांना ४४ तर ताराराणी आघाडीच्या स्मिता माने यांना ३३ मते मिळाली. शिवसनेच्या चार सदस्यांनी तटस्थ राहणे पसंत केले.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या समजोत्यानुसार राष्ट्रवादीला यंदाचे महापौरपद मिळाले. यापूर्वी काँग्रेसच्या अश्विनी रामाणे या महापौर होत्या. त्यांनी राजीनामा दिल्याने हसिना फरास यांना राष्ट्रवादीने संधी दिली. महापौरपदासाठी हसिना फरास आणि ताराराणी आघाडीच्या स्मिता माने यांच्यात लढत झाली. ताराराणी आघाडीने महापौरपद मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. परंतु काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी एकी दाखवली व शिवसेनेनेही तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे हसिना फरास या सहज निवडून आल्या. राष्ट्रवादी व काँग्रेसने आपल्या नगरसेवकांना व्हिप बजावला होता.

उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अर्जुन आनंद माने यांनी भाजपच्या विजयसिंह खाडे-पाटील यांचा ४४ विरूद्ध ३३ मतांनी पराभव केला.
विशेष म्हणजे हसिना फरास यांचे पती बाबू फरास यांनीही कोल्हापूरचे महापौरपद भूषवले आहे. १९९९ साली त्यांना शिवसेनेच्या पाठिंब्यावर ही संधी मिळाली होती. हसिना फरास यांचा मुलगा आदिल फरास हा कोल्हापूर राष्ट्रवादी युवक संघटनेचा शहराध्यक्ष असून ते ही कोल्हापूरच्या महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती होते. हसिना फरास या आमदार हसन मुश्रीफ यांच्या गटाचे मानले जातात.
कोल्हापुरात पती-पत्नींना महापौरपद मिळण्याची दुसरी वेळ आहे. यापूर्वी बंडोपंत नाईकवडे आणि सुलोचना नाईकवडे या पती-पत्नींनी महापौरपद भूषवले आहे.

chagan bhujbal
महायुतीच्या बैठकीत नाशिकचा तिढा सुटेल; छगन भुजबळ यांना विश्वास
chhagan bhujbal sharad pawar l
“शरद पवारांनी २०१४ च्या निवडणुकीवेळी…”, पटेलांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भुजबळांचा आणखी एक गौप्यस्फोट
former ncp mla ramesh kadam likely to contest lok sabha election on mim symbol in solapur
सोलापुरात एमआयएमकडून रमेश कदम लोकसभेच्या रिंगणात?
Shahu Maharaj
शाहू महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह संदेश; सतेज पाटील यांची पोलिसांकडे तक्रार