शासनाच्या चांगल्या योजना मातीमोल करण्याचे काम कसे आण िकोण करीत असतात, याची अनेक उदाहरणे दिसून येतात. त्यात जिल्हा परिषदेसारख्या ठिकाणी तर पाहायलाच नको अशी स्थिती आहे. 

येथील जिल्हा परिषदेच्या वतीने शेतकऱ्यांना अनुदानावर सेस फंडातून एचडीपीई पाईपचे वाटप करण्यात आले, पण हे पाईप निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी शेतक-यांनी केल्यामुळे या पाईपची पाहणी करून माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने सातही पंचायत समित्यांच्या गटविकास अधिका-यांना दिले आहेत.
सेस फंडातून कृषी विभागाकडून शेतक-यांना अनुदानावर अशा पाईपचे वाटप करण्यात येते. हे पाईप शेतकरी आपल्या शेतात सिंचन करण्यासाठी वापरतात. पण साडेसात अश्वशक्तीच्या मोटरचा वापर केल्यास हे पाईप फुटतात अशा तक्रारी शेतक-यांनी कृषी सभापतींकडे केल्या आहेत.
सभापती रामदास मालवे यांनी या तक्रारींची दखल घेऊन पाईप निकृष्ट दर्जाचे आहेत वा नाही याची पाहणी करण्याचे आदेश कृ षी विकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.