ऐतिहासिक पाश्र्वभूमी असलेल्या महाड तालुक्यात सर्व जातीधर्मीय बांधव सर्व प्रकारचे सण-उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करतात. यापुढेही सणासुदीच्या काळात महाडची ही शांततेची आणि जातीय सलोख्याची परंपरा अबाधित राखा, असे आवाहन प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांनी केले. गणेशोत्सव आणि बकरी ईदच्या पाश्र्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने विविध प्रशासकीय उपाययोजना करण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात शांतता समितीची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी प्रांताधिकारी सातपुते बोलत होत्या. यावेळी जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रकाश पाटील, डीवायएसपी प्रांजली सोनावणे, तहसीलदार औदुंबर खारेपाटील, महमदअली पल्लवकर आदी उपस्थित होते. शहरातील मोकाट गुरे व फेरीवाल्यांमुळे अनेक वेळा वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याच्या मुद्यावरून नगर परिषदेने कारवाई करण्याची मागणी प्रकाश मेहता यांनी केली. त्यावेळी डीवायएसपी प्रांजली सोनावणे यांनी, नगर परिषदेने याबाबत पोलीस संरक्षण मागितल्यास व तक्रार केल्यास फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले. शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांवर पडलेले खड्डे गणेशोत्सवापूर्वी भरण्यात यावेत अशा सूचना प्रांताधिकारी सातपुते यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. यावेळी चंद्रकांत कोकणे, रिपाइं अध्यक्ष मोहन खांबे, माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर, श्रीकृष्ण बाळ, सुनीता गायकवाड, बिपीन साळवे, विनायक हाटे, तालुका सेना प्रमुख सुरेश महाडिक, भाजपा तालुकाध्यक्ष मनसुर देशमुख, माधव रानडे, अल्फसा देशमुख, अकलाख गोडमे आदींनी विविध प्रश्नांवर आपल्या सूचना उपस्थित केल्या. नगराध्यक्ष महमदअली पल्लवकर यांनी गणेश विसर्जनासाठी जाखमाता घाटाचे काम पूर्ण झाल्याचे सांगून गणेशोत्सवासाठी शहरात आवश्यक ती उपाययोजना करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे उपकार्यकारी अभियंता गायकवाड, महावितरणचे उपअभियंता महेंद्र वाघपंजे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप, पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे आदी अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागामार्फत केलेल्या व्यवस्थेबाबत माहिती दिली. या सभेला पो. नि. नंदकुमार सस्ते, एसटी महामंडळ, पंचायत समिती, नगर परिषद आदी विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

Shri Ram Navami, Celebration in Shegaon, Grandeur and Devotion, gajanan maharaj shegaon, ram navami 2024, ram navami celebration in shegaon, ram navami,
‘श्रीराम नवमी’निमित्त ६७० दिंड्या दाखल, शेगावनगरी भाविकांनी फुलली
ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
Rangpanchami was celebrated in Tuljabhavani temple in a devotional atmosphere
जगदंबेच्या मंदिरात सप्तरंगाची उधळण, भक्तीमय वातावरणात तुळजाभवानी मंदिरात रंगपंचमी साजरी