संवर्धनाअभावी १६ हजार वृक्ष नष्ट होण्याच्या मार्गावर

गेल्या जुल महिन्यात कोकण आयुक्तांच्या संकल्पनेतून रायगड किल्ल्यावर १६ हजार वृक्ष लागवडीची मोहीम राबविण्यात आली होती. मोठा गाजावाजा करून राबविण्यात आलेल्या मोहिमेचा पुरता फज्जा उडाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. योग्य संगोपना अभावी यातील ९५ टक्के वृक्ष नष्ट झाली असल्याचे समोर आले आहे.

An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
vasai fort leopard
वसई किल्ला परिसरात बिबट्याची दहशत कायम, संध्याकाळ नंतर रोरो सेवा बंद करण्याची सुचना
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

गेल्या वर्षी राजभरात २ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प राज्यसरकारने सोडला होता. यानुसार रायगड जिल्ह्य़ात ४ लाख ५० हजार वृक्षांची लागवड करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आले होते. एकाच दिवशी राज्यभरात राबविलेल्या या मोहीमेच देशभरात कौतुक झाले होते. आता मात्र या उपक्रमातील त्रुटी समोर समोर येण्यास सुरुवात झाली आहे.

जागतिक तपमानात होत असलेली वाढ, वातावरणात होणारे बदल, निसर्गाचे बललेल रुतूचक्र, अनियमित पर्जन्यमान, आणि दुष्काळ या मुळे वातावरणाचा समतोल ढासळत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी १ जुल २०१६ रोजी राज्यभरात २ कोटी वृक्ष लागवडीचा उप्रकम राबविला गेला. याच उपक्रमा आंतर्गत किल्ले रायगडावर १६ हजार  वृक्षांची लागवड करण्यात आली होती. यावेळी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्यासह जिल्ह्य़ातील सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

रायगडावरील प्रतिकुल वातावरणात टिकतील अशा जातीच्या झाडांचे रोपण यावेळी करण्यात आले होते. पावसाळ्यात पाणी मुबलक असल्याने झाडांनी जीव धरला होता, मात्र पावसाळ्यानंतर हळूहळू रायडावरचे वातावरण रूक्ष होवु लागले. आज पाण्याअभावी व कडक उन्हामुळे बहुतांश झाडे मरू लागली. लागवड करण्यात आलेल्या १६ हजार वृक्षांपकी आता केवळ दोनशे ते तीनशे झाड जिवंत असल्याचे दिसून येत आहे. या वृक्षांचे योग्य संगोपन केले नाही तर ते देखील नष्ट होतील अशी भिती पर्यावरण प्रेमीकडून व्यक्त केली जात आहे.

जवळपास सोळा लाख रुपये खर्चून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र सध्या गडावर पाहायला मिळते आहे. वृक्षलागवड मोहीम दिखाव्या पुरती होती की काय असे प्रश्न आता उपस्थित केले जाऊ लागले आहे. त्यामुळे वृक्ष संवर्धनासाठी तातडीने उपाय योजना करण्याची मागणी केली जात आहे.

रायगड किल्ल्यावर राहणारया आदीवासी बांधवांना तसेच किल्ल्यावरील गाईड्सवर वृक्ष संवर्धनाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

यासाठी रोजगार हमी योजनेतून निधी देण्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र ही मजुरी अपुरी असल्याचे कारण देत त्यांनी काम करण्यास नकार दिला. त्यामुळे वृक्ष संवर्धनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

वृक्ष लागवड करणे सोपे असते पण त्यांचे संगोपन करणे अवघड असते. शासनाच्या निर्देशाप्रमाणे प्रशासनाने किल्ले रायगडावर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली. मात्र या लागवड करण्यात आलेल्या वृक्षांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केले. आज लागवड करण्यात आलेली बहुतांश वृक्ष नष्ट झाली असून उर्वरीत वृक्ष नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.   दिपक शिंदे, शिवप्रेमी.

गडावर शिल्लक राहिलेल्या झांडा भोवती तातडीने ट्रि गार्ड बसवणे गरजेचे आहे. यामुळे ऊन वारा आणि मोकाट जनावरांपासून वृक्षांचे संरक्षण होऊ शकेल. गडावरील कोलीम तलाव, काळा हौद, हनुमान टाकी, हिरकणी टाकी, आणि जगदिश्वर मंदिरा शेजातील तलावाच्या भतीची दुरुस्ती केल्यास पाण्याचे नियोजन करता येऊ शकेल. पंपाव्दारे हे पाणी सहज उपलब्ध होऊ शकेल. याबाबतचा प्रस्ताव शासनस्तरावर सादर करण्यात आला आहे.