मागील जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना आणि भाजपने एकत्रित येत राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी बाकावर बसवले. या वेळी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. जिल्हा परिषदेत सर्वाधिक सदस्यसंख्या असलेला काँग्रेस पक्ष अडचणीत आहे. सेनेच्या एका गटाची काँग्रेसबरोबर असलेली छुपी हातमिळवणी राष्ट्रवादीला उभारी देऊ शकणारी आहे. यंदाची जिल्हा परिषद निवडणूक आगामी विधानसभेची रंगीत तालीम ठरणार आहे. पालिका निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या एकूण प्रभावाला रोखण्यासाठी उदासीन काँग्रेस, आक्रमक सेना, भाजप काय रणनीती आखणार,  यावर जिल्ह्य़ाचा नेता कोण हे ठरणार आहे.

Congress Leader Mukul Wasnik, akola lok sabha seat, Mukul Wasnik Criticizes Modi Government, Alleges Anarchy in the country, BJP in power, lok sabha 2024, election campagin, akola news,
“भाजपच्या सत्तेत देशात अराजकता,” काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांची घणाघाती टीका; म्हणाले, “पराभव दिसत असल्याने…”
Shivsena, NCP, Mahavikas Aghadi,
महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचा वरचष्मा, काँग्रेसची फरफट, नाराजीची पटोलेंकडून कबुली
Congress Solapur
सोलापुरात वंचितच्या उमेदवारीमुळे मतविभागणी टाळण्याचे काँग्रेसपुढे आव्हान
maval lok sabha
अखेर मावळमधून शिवसेनेकडून खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर

जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेसचे २०, राष्ट्रवादीचे १८, शिवसेनेचे १४ आणि भाजपचे दोन, असे बलाबल आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोहारा, वाशी नगरपंचायत, सर्व बाजार समित्या आणि आठ नगरपालिका निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबलाचे गणित यंदा नक्की बदलणार हे सांगण्यासाठी कोण्या भविष्यकाराची गरज नाही. आठ नगरपालिकांपकी सर्वाधिक पाच पालिकांवर राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवून आपली ताकद सिद्ध केली आहे. काँग्रेस दोन ठिकाणी तर शिवसेनेला केवळ एका पालिकेवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेसकडून आमदार मधुकर चव्हाण, आमदार बसवराज पाटील, राष्ट्रवादीकडून माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार राहुल मोटे, शिवसेनेकडून खासदार रवींद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, शिवसेना उपनेते तथा आमदार तानाजी सावंत, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील, भाजपकडून आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा व कळंब या चार तालुक्यांत सर्वाधिक जिल्हा परिषद जागा असल्याने पक्षबळ वाढविण्यासाठी या तालुक्यांवर विशेष नजर ठेवली जात आहे.   उस्मानाबाद तालुक्यातील ७२ गावे तुळजापूर विधानसभा मतदारसंघात आहेत. तालुक्याचे नेते मधुकर चव्हाण यांच्या आमदारकीनंतर या मतदारसंघात काँग्रेसला छुपे समर्थन देण्यासाठी माजी आमदार ओम राजेिनबाळकर यांनी हा समेट घडवून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे अनेक कार्यकत्रे उघडपणे बोलत आहेत. कळंबमध्ये माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत सेनेत प्रवेश केल्यामुळे सेनेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग कुंभार यांनी पदाचा राजीनामा देत नोंदवलेली नाराजी सेनेला भोवण्याची शक्यता आहे.

केंद्र व राज्यात भाजपचे सरकार असल्याने आणि पक्षाकडून विधान परिषदेवर संधी मिळाल्यामुळे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजीतसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे यांच्या खांद्यावर सदस्य संख्याबळ वाढविण्याची जबाबदारी आहे. त्यांच्यासमोर जि.प.मध्ये सदस्य संख्या दोन अंकी करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे.

सेना नेत्यांची दिलजमाई काँग्रेसकडून

  • शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत, माजी आमदार ओम राजेिनबाळकर यांच्या पालिका निवडणुकीतील एकतर्फी राजकारणामुळे सेनेत निर्माण झालेली दुफळी बळावत चालली आहे.
  • मागील महिनाभरापूर्वी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील सेना सोडण्याच्या मार्गावर होते. मात्र काँग्रेसचे आमदार मधुकर चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी सावंत आणि पाटील यांच्यात दिलजमाई घडवून आणली.

आमदारांवर मदार

काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार मधुकर चव्हाण आणि प्रदेश सरचिटणीस तथा औशाचे आमदार बसवराज पाटील यांच्यावर जिल्हय़ातील काँग्रेसची मदार आहे. अशीच स्थिती शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड, शिवसेना उपनेते आमदार तानाजी सावंत आणि आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यावर शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पट्टय़ात चांगले दिवस आणण्याची जबाबदारी आहे.