महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा, रुपसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनचा पती आणि बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनची चेष्टा करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकण्यात आल्याचे अनेकवेळा पाहायला मिळते. स्वत: अभिषेकदेखील या पोस्टना जास्त गांभीर्याने घेताना दिसून येत नाही. परंतु, अलिकडेच एका टि्वटरकर्त्याने अभिषेकची मुलगी आराध्याच्या नावाचा आणि फोटोचा वापर करून एक खोडसाळ टि्वट पोस्ट केल्याने अभिषेकच्या रागाला त्याला सामोरे जावे लागले. अभिषेकच्या मुलीला त्याचे ‘द्रोणा’ आणि ‘झुम बराबर झुम’ हे चित्रपट आवडणार नाहीत आणि आई ऐश्वर्या रायने त्याच्याशी लग्न का केले, असा ती प्रश्न विचारेल, अशा स्वरूपाचे टि्वट पोस्ट केले आहे. अभिषेकने क्षणाचाही विलंब न लावता या वाह्यात टि्वटला सणसणीत उत्तर दिले. त्यावर टिवटरकर्त्यानेदेखील आपली बाजू लावून धरण्याचा निष्फळ प्रयत्न केला. परंतु, अभिषेकच्या वाकबाणासमोर त्याचे काही चालले नाही. यासर्वामध्ये आपल्या छोट्या मुलीला गोवणे ही बाब चांगली नसल्याची समज देत अभिषेकने सदर टि्वटरकर्त्याला चांगला धडा शिकवला. दरम्यान इतरांनी या शाब्दिक युद्धात सहभागी होऊन संबंधित व्यक्तीस दोन चांगल्या गोष्टी सुनावल्या. टि्वटरकर्त्याला आपली चूक लक्षात आली आणि शेवटी त्याने हे वादग्रस्त टि्वट काढून टाकले.

abhishek-bachchan-aaradhya2

abhishek-bachchan-aaradhya4

abhishek-bachchan-aaradhya3

abhishek-bachchan-aaradhya5

abhishek-bachchan-aaradhya6

abhishek-bachchan-aaradhya7

abhishek-bachchan-aaradhya8

abhishek-bachchan-aaradhya9बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा असल्याने अभिषेकच्या कामाची तुलना त्याच्या वडिलांशी केली जाते आणि पत्नी ऐश्वर्यालादेखील त्याच्यापेक्षा जास्त स्टारडम असल्याने अभिषेकला अनेकवेळा लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. परंतु अभिषेकने या सर्व गोष्टी कधीही मनाला लावून घेतल्या नाहीत. परंतु, छोट्या आराध्याला यात ओढल्यामुळे त्याने योग्य ते प्रत्युत्तर दिले.