शाहरुख आणि अमीर खान यांनी बजरंगी भाईजान याचित्रपटाविषयी हलकिशी कल्पना दिल्यानंतर निर्मात्यांनी लगेचच चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित केला असून कानात बाली, बारीक दाढीतला फ्रेन्च कट, गळ्यामध्ये चंदेरी गदास्वरुपातील लॉकेट आणि चेह-यावर प्रखर हावभाव अशा रुपातला सलमान आपल्याला दिसून येतो.
काल प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये सलमानचा फक्त ओठापासून ते छातीपर्यंतचा भाग दाखविण्यात आला होता. परंतू आज नव्याने प्रदर्शित करण्यात आलेले पोस्टर त्याचा चित्रपटातील एकूण लुक कशाप्रकारे असेल याची पूर्णपणे कल्पना देतो.
एका हिंदू मुलीच्या प्रेमात पडणा-या मुस्लिम माणसाची व्यक्तीरेखा सलमान या चित्रपटात साकारत आहे. हिंदू मुलीची व्यक्तीरेखा करीना कपूरने साकारली असून कबीर खान या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.
येत्या १७ जुलै रोजी ईदच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार असला तरी सलमानचे फॅन्स आतापासूच या चित्रपटाची आतूरतेने वाट पाहताना दिसत आहेत.