लेखक-दिग्दर्शक मिलाप झवेरी याने मस्ती या चित्रपटाचा स्निक पिक प्रदर्शित केला आहे.
मिलाप यांनी ट्विटरद्वारे आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली.

‘मस्ती ३’ चे चित्रिकरण सुरु करण्यात आले आहे. मस्तीच्या पहिल्या दोन भागांचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले होते. तर झवेरी आणि तुषार हिरानंदानी या दोघांनी मिळून चित्रपटाची कथा लिहिली होती. झवेरीचे दिग्दर्शन असलेला मस्तीजादे हा चित्रपटही यावर्षी प्रदर्शित होत आहे. यात पॉर्नस्टार आणि अभिनेत्री सनी लिओनीची भूमिका आहे.