शाहरुखचे त्याच्या मुलांवर असलेले प्रेम हे तर सर्वांनाच माहित आहे. तो ट्विटरवरही आपल्या मुलांसोबतचे फोटो शेअर करत असतो. पुन्हा त्यांच्यासोबत घालावलेल्या वेळाबाबतही तो माहिती देतो. आता तर तो चक्क आपल्या लेकीसाठी म्हणजेचं सुहानासाठी पुस्तक लिहणार आहे. एका चॅट शोमध्ये त्याने सुहानासाठी अभिनयावर पुस्तक लिहणार असल्याचे सांगितले.
‘अनुपम खेर शो- कुछ भी हो सकता है’ या चॅट शोच्या पहिल्या भागात शाहरुखनने उपस्थिती लावली होती. त्यावेळी तो म्हणाला की, सुहानाने अभिनय शिकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माझ्या सर्व सहअभिनेत्रींचा मी आदर करतो. आताच्या आघाडीच्या दिवा दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा आणि इतर अभिनेत्रींच्या यादीत मला सुहानाला बघायला आवडेल. सुहानाच्या अभिनय क्षेत्रात येण्याच्या निर्णयात तिचा सुपरस्टार बाबाही तिला साथ देत आहे. त्याकरिता तो खास सुहानासाठी पुस्तक लिहत आहे. या पुस्तकाचे नाव ‘टू सुहाना, ऑन अॅक्टिंग, फ्रॉम पापा’ (सुहानाकरिता वडिलांकडून अभिनयावर पुस्तक)असे आहे. या पुस्तकामध्ये अभिनयाचे धडे देणारे छोटे छोटे परिच्छेद त्यात मांडले आहेत. जेणेकरून, तिला कधी गरज लागली तर ती या पुस्तकाची मदत घेऊ शकेल. मोठा मुलगा आर्यनबद्दल तो म्हणाला की, अभिनेत्याची मुलं हेदेखील अभिनेताचं बनण्याचा सध्या बॉलीवूडमध्ये ट्रेण्ड सुरु आहे. त्यामुळे आर्यन बॉलीवूडमध्ये येण्याची शक्यता आहे. त्याच्याबाबत मी नक्की नाही सांगू शकत पण सुहाना नक्कीच बॉलीवूडमध्ये येण्यासाठी उत्सुक आहे.
सध्या शाहरुख ‘हॅप्पी न्यू इयर’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे.