महेश एलकुंचवार लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाचा रौप्यमहोत्सव २४ जानेवारी रोजी बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात आयोजित करण्यात आला आहे. जिगीषा-अष्टविनायक या संस्थेने हे नाटक ८ नोव्हेंबर २०१४ रोजी पुन्हा नव्याने रंगमंचावर सादर केले आहे.
नव्याने सादर झालेल्या या नाटकात निवेदिता सराफ, वैभव मांगले, प्रसाद ओक, भारती पाटील, सिद्धेश्वर झाडबुके, प्रतिमा जोशी, नेहा जोशी, विनिता शिंदे, अिजक्य ननावरे हे कलाकार आहेत. पूर्वी प्रायोगिक रंगभूमीवर गाजलेले आणि मराठीमध्ये अभिजात नाटक म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण झालेले हे नाटक २० वर्षांनंतर पुन्हा एकदा नव्याने रंगभूमीवर सादर झाले आहे. रौप्यमहोत्सवी प्रयोग दुपारी चार वाजता होणार आहे.