काही ना काही कला जोपासण्याची आवड असणाऱ्या व्यक्ती आपल्याला अनेकवेळा अढळून येतात. यात बॉलिवूडमधील कलाकारदेखील मागे नाहीत. अभिनेत्री तनिशाला बॉलिवूड चित्रपटातून फारशी चुणूक दाखवता आली नसली तरी ‘बिग बॉस’ या प्रसिध्द रिअॅलिटी शोमधून ती चांगलीच चर्चे आली होती. आपली नृत्याची आवड जोपासण्यासाठी ‘सोलफुल डान्स’ हा नृत्यप्रकार आत्मसात करायचा घाट तिने घातला आहे. ‘सोलफुल डान्स’ हा आंतराष्ट्रीय नृत्यप्रकार शिकण्याची हौस असलेल्या तनिशाने याचे धडे गिरवण्यासाठी अमेरिकेला प्रस्थान केले आहे. ‘सोलफुल डान्स’ नृत्यप्रकारात पारंगत झालेली तनिशा भारतात परतल्यावर तिच्या नृत्याची झलक दर्शवेल अशी आशा बाळगायला काहीच हरकत नाही