तुम्हाला नृत्याचे वेड आहे का? मग, तर नृत्य चाहत्यांसाठी पर्वणीच ठरणारा असा साहील प्रेमच्या ‘मॅड अबाउट डान्स’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
फराह खानद्वारे या ट्रेलरचे नुकतेच अनावरण करण्यात आले. ‘एबीसीडी’नंतर नृत्यावर आधारित असलेला हा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणा-या साहील प्रेमनेच चित्रपटाची कथा लिहली असून त्याचे दिग्दर्शन केले आहे. साहीलने यापूर्वी ‘रागिनी एमएमएस २’मध्ये काम केले होते. त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणारी अभिनेत्री अमरित मेघना ही लक्मेच्या जाहिरातीत झळकली आहे. ‘मॅड अबाउट डान्स’ २२ ऑगस्टला प्रदर्शित होईल.