‘चंदामामा दूर के’ चित्रपटासाठी सुशांत सिंग राजपूत जोरदार तयारी करतोय. यामध्ये तो एका अंतराळवीराची भूमिका साकारणार आहे. चित्रपटातील सुशांतच्या भूमिकेविषयी उत्सुकता असतानाच सहकलाकार आर माधवनच्या भूमिकेविषयी आतापर्यंत काहीच माहिती समोर आली नव्हती. सुशांतनंतर आता माधवनही नासामध्ये प्रशिक्षणासाठी पोहोचला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने नुकताच माधवनचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

या फोटोमध्ये माधवन स्पेससूटविषयी माहिती घेताना दिसतोय. संजय पुरण सिंग चौहान दिग्दर्शित या चित्रपटात सुशांत आणि माधवनसोबतच नवाजुद्दीन सिद्दीकीचीही भूमिका आहे. नवाजदेखील अंतराळवीराच्या भूमिकेत दिसणार आहे. नासामध्ये सुशांतने चार दिवस प्रशिक्षण घेतलं होतं.

PHOTOS : कतरिनाचे हे हॉट फोटो पाहिलेत का?

यावर्षी सप्टेंबर महिन्यात चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल. मुंबई, हैद्राबाद, दिल्ली आणि इंटरनॅशनल स्टुडिओमध्ये याचं शूटिंग होईल. संजय पूरण सिंह चौहान चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून विकी रजानी याची निर्मिती करतील. पुढच्या वर्षी २६ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.