प्रभास आणि राणा डग्गुबती यांची मुख्य भूमिका असलेला ‘बाहुबली २’ सिनेमाचा ट्रेलर १६ मार्चला प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरला ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळतो आहे त्यावरुन या सिनेमाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत हे नक्की. आतापर्यंत हा ट्रेलर ५० कोटींपेक्षाही अधिक लोकांनी पाहिला. २८ एप्रिलला प्रदर्शित होणारा हा सिनेमा पहिल्या भागापेक्षाही अधिक रंगतदार असणार असे म्हटले जाते. ‘बाहुबली’चा पहिला भाग ज्यांनी पाहिला नसेल त्यांना दुसरा भाग कळणार नाही म्हणून निर्माते ‘बाहुबली २’ हा सिनेमा प्रदर्शित करण्यापूर्वी बाहुबलीचा पहिला भागही काही दिवसआधी प्रदर्शित करणार आहेत. या सिनेमाशी निगडीत अनेक गोष्टी सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. पण बाहुबलीशी निगडीत तुम्हाला या सहा गोष्टी माहित आहेत का?

१. ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ हा सिनेमा भारतीय सिनेइतिहासातला सर्वात महागडा सिनेमा आहे. या सिनेमाचे बजेट एकूण बजेट २५० कोटी रुपयांचे आहे. ऑगस्ट २०१५ पर्यंत या सिनेमाचे ४० टक्के चित्रिकरण पूर्ण झाले होते. तर उरलेले चित्रिकरण १७ डिसेंबर २०१५ पासून हैदराबादमध्ये रामोजी फिल्म सिटीमध्ये सुरु करण्यात आले होते.
२. ‘बाहुबली’ सिनेमातला धबधब्याचे दृश्य तर सगळ्यांनाच माहिती आहे. याच धबधब्याला पार करण्याचे बाहुबलीचे लहानपणापासूनचे स्वप्न असते. पण लहानपणापासून केलेल्या प्रयत्नाला मोठेपणी यश मिळते. संपूर्ण सिनेमा बनवायला जेवढा वेळ लागला त्यातला एक तृतियांश वेळ फक्त हे दृश्य चित्रित करण्यासाठी लागला होता.
३. या सिनेमासाठी राणा डग्गुबती आणि प्रभास यांनी डाएटवर फार भर दिला होता. त्यांना व्हिएतनामच्या ट्रेनरने खास प्रशिक्षण दिले होते. या सिनेमासाठी दोन्ही अभिनेत्यांनी व्यक्तिरेखेला न्याय द्यावा म्हणून आपले ३०- ३० किलो वजन वाढवले होते. या दोघांचे वजन १०० किलोंपर्यंत गेले होते.
४. या सिनेमासाठी प्रभासने जवळपास तीन वर्षे दुसरा कोणताही सिनेमा स्वीकारला नाही. त्याने त्याचा संपूर्ण वेळ फक्त याच सिनेमासाठी दिला होता. असेही म्हटले जाते की, प्रभासने या सिनेमासाठी स्वतःचे खास जीम बनवले होते. ज्याचा खर्च दीड कोटी रुपये आला होता.
५. आपली देहयष्टी सिनेमातल्या व्यक्तिरेखेशी मिळतीजुळती असावी म्हणून प्रभासचा नाश्ताही वेगळ्या प्रकारचा असायचा. तो रोज सकाळी ४० अंडी आणि प्रोटिन पावडर घ्यायचा.
६. ‘मिड डे’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, या सिनेमात अनुष्का शेट्टीला एका गरोदर महिलेच्या व्यक्तिरेखेत दाखवण्यात आले आहे. तसेच सिनेमात स्वतःचे स्टंट स्वतः करण्यासाठी तिला खास प्रशिक्षणही देण्यात आले होते.

once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!
guru asta 2024
१४ दिवसांनी गुरु होणार अस्त! ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; नोकरीपासून प्रेमापर्यंत प्रत्येक कामात मिळू शकते यश
Trigrahi Yog in Meen Rashi
३ ग्रहांची महायुती होताच घडणार त्रिग्रही योग; ‘या’ राशींचे चमकणार भाग्य? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप