टेलिव्हिजनवर प्रसिद्धिच्या झोतात असलेला बिग बॉस हा मेगा रिअॅलिटी शो त्यातील स्पर्धकांनी केलेल्या विचित्र गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असतो. या शोदरम्यान स्पर्धकांना देण्यात आलेल्या टास्कदरम्यान अशा काही गोष्टी घडतात ज्यांची बरीच चर्चा होते. २१ ऑक्टोबरला झालेल्या एपिसोडमध्येही असेच काहीसे घडले. इतर स्पर्धकांसह झालेल्या भांडणांमुळे चर्चेत आलेली स्पर्धक प्रियांका जग्गा आता आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या बिग बॉसमध्ये सेवक आणि मालक असे दोन गट पडले आहेत. इंडिया वाल्यांनी शोचे काही नियम तोडल्यानंतर बिग बॉसने सेलिब्रेटी स्पर्धकांना एक टास्क दिले. हे टास्क पूर्ण केल्यास सेलिब्रेटी स्पर्धक घराचे मालक होऊ शकले असते.
सदर टास्ककरिता वीजे बानी, गौरव चोप्रा, प्रियांका जग्गा आणि नवीन यांना नॉमिनेट करण्यात आले होते. पण टास्कच्या सुरुवातीलाच वीजे बानी आणि नवीन यांनी त्यातून माघार घेतली. या टास्क दरम्यान, नॉमिनेट केलेल्या स्पर्धकांना घोड्यावर बसून पाणी प्यायचे होते. एकीकडे वीजे बानी आणि नवीन यांनी टास्कमधून माघार घेतली. तर दुसरीकडे प्रियांका जग्गा आणि गौरव चोप्रा टास्कमध्ये टिकून होते. बराच वेळ बसल्यानंतर प्रियांकाला टॉयलेटला जायचे होते. पण टास्क दरम्यान त्यांना उठण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, प्रियांकाला टॉयलेटलाही जायचे होते. त्यामुळे स्वतःला थांबवण्याऐवजी प्रियांकाने कपड्यांमध्येच टॉयलेट करणे सोयीस्कर समजले. त्याच्या काहीवेळानंतरच गौरवलाही टॉयलेटला झाल्याने तो धावत बाथरुमकडे गेला. गौरव जागेवरून उठताच प्रियांकाला या टास्कची विजेती घोषित करण्यात आले. ती शेवटपर्यंत घोड्यावर बसून राहिली होती.
३२ वर्षीय प्रियांका जग्गा एक सर्वसामान्य सदस्य म्हणून सहभागी झाली आहे. प्रियांका दिल्लीमध्ये मार्केटिंग रिक्रूटर आहे. ती बोल्ड आणि सुंदर तर आहेच शिवाय ती एक आईही आहे. प्रियांका जग्गा मुइस या नावाने तिला अनेकजण ओळखतात. ३२ वर्षीय प्रियांकाचा जन्म १७ डिसेंबर १९८४ मध्ये झाला. ती इतरांपेक्षा थोडी जास्तच फॅशनेबल आहे. तिच्या या फॅशनमुळेच कदाचित तिच्या सह-स्पर्धकांना तिच्याबद्दल इर्श्या वाटू शकते. प्रियांकाच्या मते, ‘मी एक मॉर्डन आई आहे. मी रुढीवादी नक्कीच नाही, त्यामुळे नियम तोडताना मला काहीच वाटत नाही. अनेकदा लोक मला आणि माझ्या फॅशनकडे सारखे बघत असतात. पण मला काहीच फरक पडत नाही. लोकं माझ्याबाबतीत काय विचार करतात याचा विचार मी अजिबात करत नाही.’ दिल्लीच्या पेज थ्री वर्तुळात सतत दिसणाऱ्या प्रियांकाला नृत्य, बॅडमिंटन, ट्रेकिंग, आणि आपल्या मित्र परिवारासोबत वेळ घालवणं पसंत आहे. तिच्या फेसबुकवर तर फक्त तिचेच फोटोशूट दिसते.