बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाख्री आणि अभिनेता उदय चोप्रा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा गेल्या काही दिवासंमध्ये शमल्या होत्या. पण, आता पुन्हा एकदा त्यांच्यातील नात्याने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. त्यांचं रिलेशनशिप चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे एक ‘टेक्स्ट मेसेज’. काही वेबसाइट्सवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार उदयने एक टेक्स्ट मेसेज करत नर्गिससोबत ब्रेकअप केला आहे.

नर्गिस आणि उदय बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे येत्या काळात ते लग्न करतील अशीही अनेकांना अपेक्षा होती. पण, आता त्यांच्या ब्रेकअपचे वृत्त येऊन धडकल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. नर्गिसने ब्रेकअपच्या सर्व चर्चा खोट्या असल्याचं सांगितलं आहे. त्यासोबतच ब्रेकअपमुळे नाही, तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपण न्यूयॉर्कला जाण्याची तयारी करत आहोत असंही तिने स्पष्ट केलं.

‘स्पॉटबॉय इ’च्या वृत्तानुसार, सध्या या दोन्ही कलाकारांमध्ये ‘ऑल इज नॉट वेल’ अशीच परिस्थिती उदभवल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे नर्गिसने इन्स्टाग्रामवरुन उदयला अनफॉलोही केलं आहे. पण, उदय मात्र अजूनही तिला फॉलो करत आहे. त्यामुळे आता यांच्या नात्यात नेमका कोणत्या कारणामुळे दुरावा आला आहे हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.

https://www.instagram.com/p/BRkfwGMluST/

https://www.instagram.com/p/BZSLJQPhzy8

वाचा : माझा मुलगा कोणत्याही मुलीला भेटू शकतो- ऋषी कपूर

नर्गिस आणि उदयने त्यांच्या रिलेशनशिपचा कधीच उघडपणे स्वीकार केला नव्हता. पण, सोशल मीडियावर त्यांच्या सिक्रेट डेटचे आणि व्हेकेशनचे फोटो नेहमीच व्हायरल होत होते. त्यामुळे हे दोघंही एकमेकांना डेट करत असल्याचं सर्वांच्या लक्षात आलं होतं.