बॉलीवूडची सध्याची बहुचर्चित जोडी रणवीर आणि दीपिकाने अद्याप जाहीररित्या आपल्या नात्याची कबुली दिली नसली तरी दोघांमधली जवळीक लपून राहिलेली नाही. नुकतेच हे दोघेही विमानतळावर एकत्र दिसून आले. रणवीर आपल्या कारमधून उतरून दीपिकाला घेण्यासाठी तिच्या कार जवळ गेला. बिनधास्त व्यक्तीमत्त्वासाठी ओळख असलेल्या रणवीरने यावेळी दीपिकाला विमानतळावरच किस केले. एरवी रणवीरसोबतच्या जवळीकतेबाबत माध्यमांसमोर मोकळेपणाने व्यक्त न होणाऱया दीपिकाचाही बिनधास्तपणा यावेळी दिसून आला. त्यामुळे या दोघांनीही आता ‘प्यार किया तो डरना क्या?’ हे सुत्र अवलंबिल्याचे त्यांच्या वावरण्यातला मोकळेपणा सांगून जातो.

दरम्यान, ‘रामलीला’मध्ये दोघांच्या केमेस्ट्रीचे भरभरून कौतुक झाले होते. ‘रामलीला’नंतर वैयक्तीक आयुष्यात रणवीर-दीपिका यांच्या प्रेमकथेला बहर आल्याची चर्चा बॉलीवूडमध्ये सुरू झाली. अनेकदा दोघेही एकत्र वावरताना दिसून आले. आता ही जोडी ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातून पुन्हा एकदा आपल्या अफलातून केमेस्ट्रीची मेख सादर करण्यास सज्ज आहे.