बॉलिवूडमध्ये अभिनेते अभिनेत्रींना जितकी प्रसिद्धी मिळते तितकीच प्रसिद्धी या क्षेत्रात काम करणाऱ्या इतरही व्यक्तींना मिळते. अशा या कलाक्षेत्रामधील असाच एक चेहरा म्हणजे वीणा नागदा. मेहंदी आर्टिस्ट असणाऱ्या वीणा बॉलिवूडमध्ये ‘मेहंदी क्वीन’ या नावाने ओळखल्या जातात.

सर्वसामान्य जैन कुटुंबामध्ये जन्मलेल्या वीणा यांना कौटुंबिक परिस्थिती आणि काही कारणास्तव जास्त शिक्षण घेता आलं नाही. त्यानंतर घरीच त्यांनी साड्यांवर एम्ब्रॉयडरी करण्याचं काम सुरु केलं. कालांतराने यात आपल्या कलात्मकतेची जोड देत त्यांनी साड्या डिझाईन करणंही सुरु केलं. यातूनच त्यांना मेहंदी डिझाइनमध्ये पुढे जाण्याचा पर्याय मिळाला. बराच वेळ घेतल्यानंतर वीणा यांनी हा नवा व्यवसाय सुरु केला. आजच्या घडीला जगात सर्वात जलद गतीने मेहंदी काढण्याचा त्यांचा विक्रमही आहे. या कलेमध्ये त्यांच्या निपुणतेची दाद द्यावी तितकी कमीच आहे. ब्राइडल मेहंदी, नेल आर्ट, शेडेड मेहंदी, हीरा मोती, अरेबिक अशा विविध प्रकारच्या मेहंदी डिझाइनमध्ये त्या पारंगत आहेत.

bollywood celebrity charge money for attending funeral
“बॉलीवूड सेलिब्रिटी अंत्यसंस्काराला जायचे पैसे घेतात,” प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा दावा; म्हणाला, “तेराव्याला जाण्याचे…”
Who are the top five bowlers who have dismissed batsmen most times on duck in IPL history
IPL 2024 : लसिथ मलिंगासह ‘या’ पाच गोलंदाजांनी आयपीएल इतिहासात सर्वाधिक फलंदाजांना केलय शून्यावर बाद
share market today
शेअर बाजारात नव्या उच्चांकाची गुढी; Sensex ची ७५००० हजारांच्या पुढे उसळी
IPL 2024 Lucknow Super Gitans vs Gurajat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: चित्त्याच्या चपळाईने बिश्नोईने टिपला झेल, सारेच झाले अवाक; पाहा व्हीडिओ

मेहंदीच्या या कलेमुळे वीणा यांनी आजवर बऱ्याच परदेश वाऱ्याही केल्या आहेत. वीणाच्या क्लाइंट्समध्ये बॉलिवूड कलाकारांपासून डायमंड किंग विजयभाई शाह आणि विविध प्रांतातील राजा- महाराजांचा सुद्धा समावेश आहे. विविध बी- टाऊन कलाकारांच्या लग्नातही वीणा यांनी मेहंदी काढण्यासाठी हजेरी लावली होती. याशिवाय ‘कभी खुशी कभी गम’, ‘कल हो ना हो’, ‘मेरे यार की शादी है’, ‘ये जवानी है दिवानी’ आणि ‘पटियाला हाऊस’ या चित्रपटांतील दृश्यांसाठीसुद्धा वीणा यांनी सेलिब्रिटींच्या हातांवर मेहंदी काढली आहे.

_1497935117

_1497935156

_1497935197

_1497935266

geeta

करवा चौथपासून ते अगदी सेलिब्रिटींच्या घरी होणाऱ्या लग्नसमारंभांमध्ये वीणा नागदा यांना आवर्जुन बोलवलं जातं. आपल्या या कलेची देणगी त्यांनी इतरांनासुद्धा दिली आहे. त्यांचं एक  मेहंदी ट्रेनिंग सेंटरही आहे. जेथे बऱ्याच विद्यार्थांना त्यांनी ही सुरेख कला शिकवली. असं म्हटलं जातं की, सेलिब्रिटींच्या लग्नात त्यांना मेहंदी लावण्यासाठी वीणा कोणतेच शुल्क आकारत नाही. वीणा नागदा हे नाव जरी आता अनेकांच्या माहितीचं झालं असलं तरीही एक काळ असा होता की, बरेचजण त्यांच्या कलेपासून अनभिज्ञ होते हेच खरं.

वाचा : जाणून घ्या, मराठी कलाकारांचे मानधन

deepika

veena-nagda-bollywood-mehendi-queen

ban-2