चित्रपट आणि रंगभूमीवरील आपल्या कसदार अभिनयाने आपले वेगळे असे स्थान निर्माण केलेल्या मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट या अभिनेत्री ‘आम्ही दोघी’ या आगामी मराठी चित्रपटातून पहिल्यांदाच एका वेगळ्या भूमिकेमध्ये एकत्र येत आहेत. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे सादरीकरण आणि निर्मिती असलेला हा चित्रपट १६ फेब्रुवारी २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल. अभिनेत्री, कॉस्चुम डिझायनर व सह-दिग्दर्शक म्हणून चित्रपट रसिकांना माहित असलेल्या प्रतिमा जोशी यांचे दिग्दर्शनीय पदार्पण असलेल्या या चित्रपटाबद्दल चित्रपटसृष्टीमध्ये उत्सुकता आहे.

वाचा : VIDEO भिकारीच्या मुलाने हस्तांदोलनासाठी रणवीरसमोर हात पुढे केला अन्…

Mr. Gay Nepal 2024
‘मिस्टर गे नेपाळ २०२४’ चा किताब लक्ष्मण मगर यांनी जिंकला; आता लंडनमध्ये करणार प्रतिनिधित्व
Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
suparna shyam play important role in new show
निलेश साबळेच्या नव्या शोमध्ये झळकणार ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्याची पत्नी! आजवर लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम

मुक्ता ही आजची मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची कलाकार आहे. तिने आतापर्यंत बऱ्याच चित्रपटांबरोबरच टीव्ही मालिका आणि नाटकांमध्येही वैविध्यपूर्ण भूमिका केल्या आहेत व त्यासाठी तिला पुरस्कारही मिळाले आहेत. ‘जोगवा’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाच्या भूमिकेसाठी तिचे कौतुक झाले. प्रिया बापट हिने मराठी चित्रपटांबरोबरच हिंदीमध्येही अनेक महत्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. ‘काकस्पर्श’ या चित्रपटाने तर तिला सर्वदूर प्रसिद्धी मिळवून दिली.

प्रतिमा यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या तब्बल दहा चित्रपटांमध्ये सह-दिग्दर्शक म्हणून जबाबदारी पारी पाडली आहे. या चित्रपटांमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘आजचा दिवस माझा’ या चित्रपटाचाही समावेश आहे.

वाचा : जाणून घ्या, ईदला प्रदर्शित होणाऱ्या सलमानच्या ‘भारत’ चित्रपटाविषयी..

निर्मिती आणि सादरीकरणाची जबाबदारी स्विकारलेल्या एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटने आत्तापर्यंत अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली असून त्यामध्ये ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘तुकाराम’, ‘आजचा दिवस माझा’, ‘हॅप्पी जर्नी’, ‘टाईम प्लीज’, ‘मुंबई-पुणे-मुंबई २’, ‘बापजन्म’ आणि २०१८ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ या चित्रपटांचा समावेश आहे.