पिंक गर्ल तापसी पन्नू सध्या तिच्या ‘नाम शबाना’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. तिच्या चित्रपटाला समीक्षकांकडून दाद मिळाल्यानंतर शुक्रवारी तापसी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या खास स्क्रिनिंगवेळी तापसीने तिच्या आगामी ‘जुडवा २’ चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचे सांगितले. तापसी पन्नू ‘जुडवा २’ या चित्रपटामध्ये वरुण धवन सोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटातील भूमिकेविषयी ती म्हणाली, आगामी चित्रपटात अॅक्शनपेक्षा प्रेक्षकांना रोमान्सची रिअॅक्शन पाहायला मिळेल. या चित्रपटातील ‘टन टना टन’ आणि ‘ऊंची है बिल्डिंग’ या दोन्ही गाण्यामध्ये दिसणार असल्याचेही तिने यावेळी स्पष्ट केले.

सलमान खानच्या ‘जुडवा’ चित्रपटाच्या सिक्वेलचे दिग्दर्शन डेविड धवन यांनी केले आहे. ‘नाम शबाना’ या चित्रपटाच्या खास स्क्रिनिंगसाठी तापसीने धवन कुटुंबियांना खास निमंत्रण दिले होते. चित्रपटसृष्टीतील खास कुटुंबियांबाबत ती म्हणाली की, डेविड कुटुंबिय माझ्यासाठी खास आहेत. डेविड धवन कुटुंबियांबद्दल तापसीच्या विशेष जिव्हाळ्याला आगामी चित्रपट नव्हे, तर तिच्या पदार्पणातील भूमिका कारणीभूत आहे. तापसीने डेविड धवन यांच्या ‘चष्मे बहादूर’ या चित्रपटातून बॉलिवडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरला नव्हता, पण हा पहिला चित्रपट ती कधीही विसरु शकणार नाही.

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
Love Sex Aur Dhokha 2 to feature trans woman Bonita Rajpurohit
एकेकाळी १० हजार रुपये महिन्याने करायची काम, आता ट्रान्सवूमन बोनिता एकता कपूरच्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार
ice cream rice
सई ताम्हणकरप्रमाणे तुम्ही खाऊ शकता का आईस्क्रिम भात? विचित्र खाद्यपदार्थाचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

तापसीच्या ‘नाम शबाना’ चित्रपटाविषयी बोलायचे तर तिचा हा चित्रपट भारतातील पहिला ‘स्पिन ऑफ’ चित्रपट आहे. अक्षय कुमारच्या बेबी चित्रपटातील तापसीच्या छोट्या भूमिकेची कहाणी या चित्रपटातून उलगडण्यात आली आहे. तिच्या या चित्रपटात बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असून, ५०० हून अधिक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले अनुपम खेर तिला वेळप्रसंगी मार्गदर्शन करताना दिसणार आहेत. ‘पिंक’ चित्रपटातून वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तापसीला हा चित्रपटाला कशाप्रकारे प्रतिसाद मिळतोय हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.