एकता कपूरच्या कसोटी जिंदगी की या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्या मृत्युची अफवा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शुक्रवारी दंगल फेम साक्षी तन्वरच्या फेसबुक फॅन पेजवर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. ही पोस्ट वाचून सर्वजण हैराण झाले. आणि या बातमीची शहानिशा करायला लागले. श्वेता तिवारीचा मृत्यू झाला ही बातमी कळाल्यापासून मी हैराण झाली आहे. ‘कसोटी जिंदगी की’मधली प्रेरणा आता आपल्यात राहिली नाही, अशी पोस्ट फेसबुकवर फिरत आहे.

हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर श्वेताच्या घरी अनेक मित्र मैत्रिणींचे आणि नातेवाईकांचे फोन येऊ लागले होते. सततच्या फोन आणि मेसेजमुळे घरातील मंडळींना खूप मनस्तापाला सामोरे जावे लागले. त्यामुळे श्वेताचा नवरा अभिनव कोहली याने या त्रासाला कंटाळून एका इंग्रजी वेबसाइटला ही अफवा असल्याचे सांगितले. ही बातमी जेव्हा माझ्यापर्यंत आली तेव्हा मी फारच घाबरलेलो कारण काही तासांपूर्वीच माझं आणि तिचं बोलणं झालं होतं. मी लगेच तिला फोन केला आणि तिला हे सर्व सांगितलं. हा सर्व प्रकार ऐकून तिला फार हसू आलं.

दीपक तिजोरीच्या अडचणीत वाढ, पत्नीने केली घरगुती हिंसेची तक्रार

श्वेताच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर व्हायरण होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही दोन वेळा तिच्या मृत्यूची बातमी व्हायरल झाली होती. यावर बोलताना श्वेता म्हणाली की, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. मी जिवंत आहे आणि माझी तब्येत उत्तम आहे.
श्वेता लवकरच टीव्हीवर पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. ती सध्या तिला साजेशा अशा चांगल्या संहितेच्या शोधात आहे.

२०१३ मध्ये श्वेता, अभिनव कोहलीसोबत विवाह बंधनात अडकली होती. श्वेताने राजा चौधरीला काही वर्षांपूर्वी घटस्फोट दिला होता. श्वेताला एक मोठी मुलगीही आहे.  काही दिवसांपूर्वीच श्वेताने एका गोंडस बाळाला जन्म दिला. रेयांश असे तिने बाळाचे नाव ठेवले आहे. श्वेता सोशल मीडियावर फार सक्रिय असते. तिने आपल्या मुलीचे आणि मुलाचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने शेअर केलेले अनेक फोटो सतत व्हायरल होत असतात.