भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार लौकिक मिळवलेला महेंद्रसिंग धोनी आणि अभिनेता सुशांतसिंग राजपूत हे दोघेही सध्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखे वावरत आहेत. बॉलीवूडचा उगवता तारा सुशांत सिंग राजपूत याने भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर आधारित चित्रपटात तो धोनीची भूमिका साकारल्यानंतर लोकप्रिय झाला आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या पार्श्वभूमीवर अनेकदा सुशांत राजपूत आणि महेंद्र सिंग धोनी चर्चेत आले होते.

आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मोहालीमध्ये रंगलेल्या तिसऱ्या एकदिवशीय सामन्यात सुशांत राजपूतने उपस्थिती लावल्याने दोघे पुन्हा चर्चेत आले आहेत. ट्विटरवर सध्या #DhoniSushantOnField हा हॅश टॅग ट्रेंडिगमध्ये आला आहे. धोनीच्या आयुष्यावरील चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि सुशांत प्रत्यक्षात सामन्यावेळी एकत्र दिसण्याची ही पहिली वेळ आहे. त्यामुळे या भेटीची नेटीझन्सनी एका फिल्डवर दोघांचे दर्शन झाल्याची तुलना करताना दिसत आहेत.

धोनीच्या आयुष्यावर आधारित चित्रपट साकारताना धोनीचा हेलिकॉप्टर शॉटसाठी सुशांतने मेहनत घेतली होती. या चित्रपटालाही प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली. त्यामुळे धोनीच्या नावाने लोकप्रियता  मिळविलेल्या सुशांतच्या उपस्थित न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात धावांचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार धोनी सुशांतला आपला हेलिकॉफ्टर शॉट दाखविणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. धोनीने एकदिवसीय सामन्यात आतापर्यंत १९३ षटकार ठोकले आहेत. आजच्या सामन्यात सुशांतच्या साक्षीने त्याने चित्रपटासारखी खेळी केली तर भारताकडून एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकाराचा विक्रम धोनी आपल्या नावे करु शकतो. भारताकडून सचिन तेंडुलकरने सर्वाधिक १९५ षटकार ठोकले आहेत.