‘व्हॅलेन्टाईन डे’ आपण दरवर्षी साजरा करतो. आपल्या प्रिय व्यक्तींसाठी हा खास दिवस असतो. आपल्या भारतीय संस्कृतीत या दिवसाला इतके महत्व नसले तरी तरुणाईमध्ये या दिवसाची क्रेज जास्त पाहायला मिळते.  असे असले तरी, ‘व्हॅलेन्टाईन डे’ बद्दल मात्र माझी व्याख्या वेगळी आहे. आपल्याकडून दुखावले आणि दुरावले गेलेल्या लोकांना पुन्हा जवळ आणण्याचा प्रयत्न मी या दिवशी करतो. माझ्या पत्नीचे देखील ‘व्हॅलेन्टाईन डे’ बद्दल हेच मत आहे. जीवनात आनंदी राहायचे असेल तर पहिले स्वतःचे नातेसंबंध जपा.  प्रेमाने जग जिंकता येते. अर्थात, त्यासाठी आपल्याला चांगला माणूस होण गरजेच आहे. पाश्चिमात्य देशातून आपल्या भारतात आलेला ‘व्हॅलेन्टाईन डे’ देखील हाच संदेश आपल्याला देतो. त्यामुळे जर दररोज प्रेमाने वागलो तर रोजच आपण हा दिवस साजरा करू शकू. कुटुंबातील नातेसंबंध जपा आयुष्य ‘वृंदावन’ सारखे सुंदर होईल. माझा आगामी ‘वृंदावन’ हा एक कौटुंबिक सिनेमा असून त्यात हाच संदेश देण्यात आला आहे.

A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Shukra Gochar In Mesh
२४ एप्रिलपासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?सुख-समृद्धीचा कारक ग्रह राशी बदल करताच मिळू शकते चांगला पैसा
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !