पाणी उपसण्यासाठी २७० ठिकाणी पंप ; गाळ टाकण्यासाठी नऊ ठिकाणे
गेल्या वर्षी पावसाळ्यात मुंबईत काही ठिकाणी पाच-पाच तास पाणी साचून राहिले होते. यंदाच्या वर्षी तशी परिस्थिती मुंबईत नसेल. मोठी भरती आणि अतिवृष्टी झाली तरच मुंबईत पाणी भरेल. मात्र या पाण्याचा अवघ्या पंधरा मिनिटात निचरा होईल. मुंबई ‘ठप्प’ होणार नाही, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
आगामी पावसाळ्याच्या निमित्त महापालिका प्रशासन सज्ज झाले असून नालेसफाई व रस्त्यांच्या कामांच्या प्रगतीचे सादरीकरण अतिरिक्त महापालिका आयुक्त संजय देशमुख यांनी शुक्रवारी पालिका मुख्यालयात सादर केले. नालेसफाईची ६६ टक्के कामे पूर्ण झाली असून येत्या ३१ मे पर्यंत नालेसफाईची सर्व कामे पूर्ण होतील, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
मुंबई शहरातील ४२ टक्के, पूर्व उपनगरातील ५५.५५ टक्के तर पश्चिम उपनगरातील ६७ टक्के नालेसफाईची
कामे पूर्ण आहेत. मुंबईत सर्व विभागात कंत्राटदार नेमून नालेसफाईची कामे वेगाने सुरू असून कामचुकार कंत्राटदारांची गय केली जाणार नाही. नालेसफाईच्या कामाबाबत राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या आरोपात काही अंशी तथ्य असले तरी नाले साफ केले नाहीत असे म्हणण्यात तथ्य नाही. साफ केलेले नाले पुन्हा कचऱ्याने भरत आहेत. हे नाले दोनदा किंवा तीनदा साफ करावे लागले तरी आम्ही ते करू असेही त्यांनी सांगितले.
नाल्यातून काढलेला गाळ टाकण्यासाठी नऊ ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यात नवी मुंबईतील महापे येथील कडवळी गाव, आडवळी भुतावळी, ठाणे जिल्ह्यातील बोरिवली, माजलीपाडा गाव, चेने गाव, वसई तालुक्यातील ससून वधर, माझलीपाडा गाव आदी ठिकाणांचा समावेश आहे. गाळ वाहून नेणारा किती भरला त्यापेक्षा
गाळाचे वजन, वजन काटय़ावर केले जाईल. तसेच ‘जीपीएस सिस्टिम’चा ही वापर केला जाणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
सर्व विभागात कंत्राटदारांसह १ लाख ६४ हजार कामगार तनात केले असून मिलन सबवेसह सर्व सबवेंच्या ठिकाणी पंप बसविले जाणार असल्याचे सांगून देशमुख म्हणाले, मुंबईत तासाला ५० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्यास आणि समुद्राला भरती असल्यास िहदमाता परळ, शीव येथील रोड नंबर २४ आणि नायर रुग्णालयच्या प्रवेशद्वारासमोर अशा तीन ठिकाणी पाणी मोठय़ा प्रमाणात भरेल. या ठिकाणी साचणाऱ्या पाण्याचा उपसा तत्काळ केला जाईल. मुंबईत पाणी भरण्याची ४० ठिकाणे असून पाण्याचा उपसा करण्यासाठी २७० ठिकाणी पंप बसविले जातील.

हिंदमाता परिसरात पाणी साठणार नाही!
‘हिंदमाता’ परिसरात यंदा पाणी भरणार नाही. ब्रिटानिया पंिपग स्टेशन येत्या ३१ मे पासून पूर्ण क्षमतेने सुरू होईल. येथे साचणाऱ्या पाण्याचाही तातडीने निचरा होईल. या पंिपग स्टेशनची पाण्याचा उपसा करण्याची क्षमता सहा हजार लिटर प्रतिसेकंद इतकी असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली.