शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा वाद सुरू असला तरी दुसरीकडे बाळासाहेबांचा २३ फुटांचा भव्य पुतळा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. ताडदेव येथील एका कार्यशाळेत या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
बाळासाहेबांच्या या भव्य पुर्णाकृती पुतळ्याचे काम शिल्पकार यावलकर करत असून त्याच्या मेणाच्या आणि फायबरचे काम पूर्ण झाले आहे. पुतळ्यावर शेवटचा हात फिरविण्यासाठी तो कोल्हापूरला पाठवला जाणार आहे. भाषण करण्यापूर्वी बाळासाहेब जाहीर सभेत ज्या पेहरावात जायचे त्याच लकबीतला आणि शैलीतला हा पुतळा बनविण्यात आला आहे. नुकतीच शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या कार्यशाळेला भेट देऊन पुतळ्याच्या कामाचा आढावा घेतला. लवकरचा हा पुतळा मुंबईत उभा राहणार आहे.