काही दिवसांपूर्वी मुंबई राजभवनाखाली ब्रिटिशकालीन बांधकाम आढळून आले. सकृतदर्शनी ते लष्करी हालचालींसाठी बांधलेले बंकर्स आहेत असे जरी वाटत असले तरी त्याच्या बांधकामशैलीवरून ते सुसज्ज असे तळघर असावे, असे म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल. राजभवनाखालील या तळघराला भेट दिल्यानंतर त्याचा वास्तू संवर्धनाच्या दृष्टिकोनातून घेतलेला हा आढावा

राजभवनातील हे तळघर १५० ते २०० मीटर लांब आणि अंदाजे १२ ते १५ फुट उंचीचे हे भुयारी तळघर सुमारे ५००० चौ.मी. परिसरात पसरलेले आहे. तळघरात हवा खेळती राहण्यासाठी एअर व्हेन्ट्स (air vents) दिलेले आहेत, तसेच संपूर्ण तळघरात सांडपाणी वाहून जाण्याची व्यवस्था करण्यात आलेली दिसते. यावरून त्याचा उपयोग फक्त साठवणुकीसाठी होत नसावा. दगडी भिंतीना चुन्याचा गिलावा केलेला आढळतो. छताचा सुरुवातीचा भाग हा फ्लॅट स्लॅब या  प्रकारचा असून आतमध्ये गेल्यावर पुढचे छत हे व्हॉल्टेड सिलिंग कमानी पद्धतीने बांधले गेले आहे. स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनी हे तळघर बंद केले असावे. कारण भिंतीना आधुनिक प्रकारे रंगविण्याचा प्रयत्न केलेला आढळतो आणि तारखेचा ओझरता उल्लेखदेखील केलेला दिसून येतो.

demolishing building , citizens, Nandivali, dombivli, trouble of dust
Video : डोंबिवलीत नांदिवलीत रहिवासी, प्रवासी धुळीच्या लोटांनी हैराण; पुनर्विकासासाठी इमारत तोडताना नियम धाब्यावर
girl brother attempt to kidnapped midc police saved abducted youth life
कारमध्ये कोंबून प्रेयसीच्या भावाचे अपहरण….पण,  खुनाचा प्रयत्न करताच….
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना

सध्या एका प्रवेशद्वाराचा शोध लागला आहे. पण इतर अनेक प्रवेश विटकाम करून किंवा दगडांनी बंद केलेले आढळतात. तब्बल १३ मोठय़ा खोल्या असलेल्या या तळघरात अनेक ठिकाणी लष्करी उल्लेख आढळतात. शेल स्टोअर, गन शेल, कार्टेज स्टोर, शेल लिफ्ट यांसारख्या नावाने या खोल्या आहेत. एके ठिकाणी लोखंडी दरवाजा व त्यापलीकडे दगडी फरश्यांचा मार्ग (रॅम्प) आहे. या सगळ्या तपशिलाचा एक ब्रिटिश मिलिटरी वास्तुकलेचा एक उत्तम नमुना या दृष्टीने अभ्यासपूर्ण विचार करणे गरजेचे आहे. या तळघराची व्याप्ती लक्षात घेता त्याचे जतन आणि संवर्धन करणे महत्त्वाचे ठरेल. विशेष म्हणजे डॉ. गोरक्षकर यांच्या ‘राजभवन इन महाराष्ट्र’ या पुस्तकात छापलेल्या १८६८ सालच्या नकाशातदेखील या तळघर वा बंकर वा मिलिटरी स्टोअरेजचा उल्लेख आढळतो. या ब्रिटिशकालीन तळघराचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी त्याचा स्ट्रक्चरल इंजिनीअरिंगच्या दृष्टिकोनातून डोळसपणे विचार व्हायला हवा. अन्यथा या तळघराबद्दल अनेक दंतकथा निर्माण होऊन सत्य आणि अद्भुत स्वरूप सामान्य लोकांपर्यंत पोहोचणार नाही. सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर आणि योग्य पद्धतीने त्या तळघराचे पुनरुज्जीवन केल्यानंतर त्याचा समावेश मुंबईच्या ऐतिहासिक पर्यटन स्थळामध्ये करता येऊ शकतो.

या तळघराच्या निमित्ताने फोर्टमधील अनेक ब्रिटिशकालीन इमारतींच्या खाली अथवा त्या जवळच्या परिसरात तळघर स्वरूपाचे बांधकाम असू शकेल अशी चर्चा सुरू आहे. जवळपास सर्वच इमारती या लोड बेअरिंग स्ट्रक्चर स्वरूपामध्ये बांधलेल्या आहेत. या सर्व इमारतींचे सर्वेक्षण करणे गरजेचे ठरेल. या सर्वेक्षणात काही तळघरे सापडल्यास त्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का किंवा त्यातील काही भुयारे वा तळघरे एकमेकांशी जोडली गेली असावीत का असाही अभ्यासाचा पलु विचारात घेता येईल. मात्र या सर्वाचा अत्यंत तटस्थपणे आणि वस्तुनिष्ठ पुराव्यानिशी अभ्यास होणे महत्त्वाचे ठरेल. आणि यातूनच मुंबईमधील ब्रिटिशकालीन वास्तुवैभवाचे जमिनीखाली दडून राहिलेले अद्भुत उघडकीस येईल.

राहुल चेंबूरकर – वास्तू संवर्धनतज्ज्ञ