अ‍ॅण्टॉप हिल येथील एका सार्वजनिक शौचालयात पाच महिन्याचे पुरूष जातीचे मृत अर्भक सापडले आहे. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अ‍ॅण्टॉप हिलच्या निर्मलनगर परिसरातील सार्वजनिक शौचालयात एका महिलेला हे मृत अर्भक दिसले. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून शोध घेत आहेत. यापरिसरात कुणी महिला गर्भवती होती का तसेच परिसरातील रुग्णालयातूनही तपास केला जात आहे.