एरवी शांत असलेल्या परंतु अतिपावसामुळे रौद्ररूप धारण केलेल्या सावित्री नदीचा उगम पावतो महाबळेश्वरात. तेथून ती पोलादपूरमार्गे महाडला वळते आणि पुढे दासगाव, आंबेत, हरिहरेश्वरमार्गे रत्नागिरी जिल्ह्य़ातील बाणकोट येथील खाडीत समुद्राला मिळते. हरिहरेश्वपर्यंतचा नदीचा हा प्रवास किनारपट्टीच्या मार्गाने मोजायचा झाल्यास ४० किलोमीटर आहे. मंगळवारी त्या काळरात्री दोन एसटी बस आणि तीन लहान वाहने नदीत कोसळल्यानंतर त्यातील बेपत्ता प्रवाशांचे निष्प्राण देह आता हळूहळू हाती लागू लागले आहेत. नदीच्या प्रचंड प्रवाहात हे मृतदेह घटनास्थळाच्या ठिकाणाहून कैक किलोमीटर अंतरापर्यंत वाहात गेले आहेत. अजूनही १८ जणांचा शोध सुरूच आहे..
बुधवारी रात्री उशिरापर्यंत १५ मृतदेह हाती लागले.
- केंबुर्ली : रंजाना वाजे, पांडुरंग घाग, बाळकृष्ण वरक, प्रभाकर शिर्के, अनिष बलेकर
- म्हाप्रळ : सुनील बैकर, जयेश बाणे
- हरेश्वर : शेवंती मिरगळ
- दादली : आवेद चौगुले
- आंजर्ले : श्रीकांत कांबळे
- आंबेत : मंगेळ कातकर
- राजेवाडी : स्नेहल बैकर
- तोराडी : प्रशांत माने
- वराडी : रमेश कदम