मुसळधार पावसामुळे शुक्रवारी सकाळपासून मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले असून मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे अशा तिन्ही मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. तिन्ही मार्गावरील लोकल १०-१५ मिनिटे उशिराने धावत आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवार सकाळपासून जोरदार पाऊस पडत असून, रस्ते वाहतूक आणि लोकल सेवा खोळंबली आहे. दादर, लोअर परळ, वरळी भागात जोरदार पाऊस पडत असून ठिकठिकाणी ट्राफीक जामच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे चाकरमान्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
*  मध्य, पश्चिम आणि हार्बर या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरील ट्रेन्स १५ ते २० मिनिटे उशिराने
* घाटकोपर, कांजुरमार्ग, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याणमध्ये पावसाची संततधार.
* मुंबई शहरात रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पावसाची ४४.७२ मिलीमीटर इतकी नोंद
* ठाणे, नवी मुंबईतही जोरदार पाऊस
* रात्रभर पडलेल्या पावसामुळे काही भागात पाणी साचलं, शहर आणि उपनगरात पावसाची संततधार सुरुच