दादरचे ‘हेरिटेज’ करण्यापेक्षा ‘विक्रांत’ युध्दनौका ‘हेरिटेज’ म्हणून जतन करावी, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी केली. त्यामुळे आता विक्रांतला भंगारात जाण्यापासून वाचविण्यासाठी भाजपबरोबरच मनसेनेही भूमिका घेतली आहे. विक्रांत युध्दनौका भंगारात जाऊ नये, यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली किरीट सोमय्या व अन्य नेत्यांनी संरक्षण मंत्री ए.के.अँटनी यांची भेट घेतली आहे. भाजपने सादर केलेल्या प्रस्तावावर विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Dec 2013 रोजी प्रकाशित
दादरपेक्षा ‘विक्रांत’ चे ‘हेरिटेज’ करा
दादरचे ‘हेरिटेज’ करण्यापेक्षा ‘विक्रांत’ युध्दनौका ‘हेरिटेज’ म्हणून जतन करावी, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी केली

First published on: 08-12-2013 at 02:58 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Make vikrant as heritage except dadar raj thakre