’पश्चिम रेल्वे ’कुठे? – वसई रोड आणि विरार धीमा मार्ग’कधी? – स. १०.३० ते दु. १.३०
’परिणाम – जम्बोब्लॉकच्या काळात बोरिवली/वसई रोड आणि विरार स्थानकांदरम्यान सर्व अप आणि डाऊन दिशेच्या गाडय़ांची वाहतूक जलद मार्गावरून होणार आहे. या बदलामुळे होणाऱ्या परिणामांची तपशीलवार माहिती सर्व स्थानकांवर उपलब्ध असल्याचे पश्चिम रेल्वेतर्फे सांगण्यात आले.
ल्ल ल्ल ल्ल
’मध्य रेल्वे
’कुठे? – ठाणे ते कल्याण डाऊन जलद मार्ग
’कधी – स. १०.३० ते दु. ३.००
’परिणाम – सकाळी ९.३७ पासून दुपारी २.२५ वाजेपर्यंत सीएसटीहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या गाडय़ा आपल्या निर्धारित स्थानकांबरोबरच घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबतील. ठाणे स्थानकातून या गाडय़ा डाऊन धीम्या मार्गावरून वळवण्यात येतील. तर सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या अप जलद लोकल गाडय़ाही निर्धारित स्थानंकाबरोबर मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकोंवर थांबतील. सर्व गाडय़ा २० मिनिटे उशिराने धावणार. लोकमान्य टिळक टर्मिनसहून सकाळी ११.४० वाजता सुटणारी नेत्रावती एक्स्प्रेस दुपारी २.३० वाजता सुटणार.
ल्ल ल्ल ल्ल
’हार्बर रेल्वे
’कुठे? – मस्जिद-चुनाभट्टी आणि वडाळा रोड ते माहीम अप आणि डाऊन मार्ग
’कधी? – स. ११.३० ते दु. ३.३०
’परिणाम – सकाळी १०.४८ पासून ते दुपारी ३.३३ वाजेपर्यंत सीएसटीहून वांद्रे ते अंधेरीकडे येणाऱ्या दोन्ही दिशांच्या गाडय़ांची वाहतूक बंद राहील. तर वाशी-बेलापूर-पनवेल ते सीएसटी दरम्यानही दोन्ही दिशेकडच्या गाडय़ांची वाहतूक बंद राहील.