मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोल वसुलीची अधिसूचना जारी; तीस वर्षे टोल भरावा लागणार
- कोयना धरणग्रस्त करणार क्रांतिदिनी जलाशयात आंदोलन
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेवरील आपले अबाधित वर्चस्व मुंबईच्या संघाने 'मुंबई चालिसा' हा ऐतिहासिक सुवर्णाध्याय लिहून साजरे केले. 'मुंबै, मुंबै..' हा अविरत नारा वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटरसिकांचा सुरू होता. त्यांच्याच साक्षीने मुंबई संघाने सौराष्ट्रचा एक डाव आणि १२५ धावांनी पराभव केला आणि विजेतेपदाच्या जल्लोषाला झोकात प्रारंभ केला.
मुंबईने अजित आगरकर व धवल कुलकर्णी यांच्या वेगवान माऱ्याच्या बळावर सौराष्ट्रचा दुसरा डाव फक्त ८२ धावांवर गुंडाळला आणि तिसऱ्या दिवशीच रणजी करंडकावर शिक्कामोर्तब केले. 'जीत जायेंगे हम तू अगर संग है..' ही ऊर्जा निर्माण करणारा सचिन तेंडुलकर आणि मुंबईकर क्रिकेटरसिकांच्या साक्षीने आगरकरने राष्ट्रीय क्रिकेटवरील मुंबईचा ठसा उमटविणारा चषक उंचावला. त्यानंतर मुंबईच्या ड्रेसिंगरूममध्ये मुंबईचे खेळाडू आणि पदाधिकाऱ्यांनी एक अनोखा जश्न साजरा केला. मुंबईला रणजी विजेतेपदाचे दोन कोटी बक्षीस मिळाले. याचप्रमाणे मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून रणजी विजेत्या मुंबईच्या खेळाडूंना तीन कोटी रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले.
जल्लोष आणि पाच कोटी
'जीत जायेंगे हम तू अगर संग है..' ही ऊर्जा निर्माण करणारा सचिन तेंडुलकर आणि मुंबईकर क्रिकेटरसिकांच्या साक्षीने आगरकरने राष्ट्रीय क्रिकेटवरील मुंबईचा ठसा उमटविणारा चषक उंचावला. त्यानंतर मुंबईच्या ड्रेसिंगरूममध्ये मुंबईचे खेळाडू आणि पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला. मुंबईला रणजी विजेतेपदाचे दोन कोटी बक्षीस मिळाले. याचप्रमाणे मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून रणजी विजेत्या मुंबईच्या खेळाडूंना तीन कोटी रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















