१५ डिसेंबरला ‘व्हिवा लाउंज’मध्ये प्रिया बापट

मराठी चित्रपटसृष्टीतील एक ‘वजनदार’ नायिका अशी ओळख निर्माण करणारी आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट येत्या गुरुवारी, १५ डिसेंबरला ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’ या कार्यक्रमात पाहुणी म्हणून रसिकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमानिमित्ताने या लोकप्रिय अभिनेत्रीशी मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे.

Arushi Sharma Married to Casting Director vaibhav vishant
कार्तिक आर्यनच्या हिरोइनने गुपचूप उरकलं लग्न, सुप्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर आहे पती, फोटो आले समोर
suparna shyam play important role in new show
निलेश साबळेच्या नव्या शोमध्ये झळकणार ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्याची पत्नी! आजवर लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम
priyanka chopra nick jonas attended mannara chopra birthday
Video: प्रियांका चोप्रा पती निक जोनससह पोहोचली बहिणीच्या वाढदिवसाला, ग्लॅमरस लूकने वेधलं लक्ष, पाहा व्हिडीओ
Kaanta Laga girl Shefali Jariwala
एक सुपरहिट गाणं, सलमान खान-अक्षयसह केलं काम; फिटमुळे करिअरवर झाला परिणाम, अभिनेत्रीने १० वर्षांपूर्वी…

मराठीतील मोजक्या ग्लॅमरस नायिकांपैकी एक असा लौकिक असला, तरी प्रियाच्या अभिनयाचेही नेहमी कौतुक झाले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘वजनदार’ चित्रपटातून प्रियाचा दमदार अभिनय प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. याआधी सचिन कुंडलकर यांच्याच ‘हॅपी जर्नी’ या चित्रपटातील अभिनयासाठी तिला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला होता.

प्रिया मूळची मुंबईची. सुरुवातीला बालकलाकार म्हणून काही मोजक्या चित्रपटांतून ती दिसली. त्यानंतर ‘आभाळमाया’, ‘बंदिनी’, ‘दामिनी’सारख्या त्या काळातील गाजलेल्या मालिकांमध्ये छोटय़ा भूमिका करण्याची संधी तिला मिळाली. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे प्रिया बापट हे नावही चित्रपटसृष्टीत रुळले. त्याअगोदरच ‘मुन्नाभाई एम.बी.बी.एस.’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटांतून प्रियाने छोटय़ा, पण लक्षवेधी भूमिका केल्या होत्या. प्रियाच्या अभिनयाची चुणूक ‘काकस्पर्श’ या चित्रपटातून दिसली आणि त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. ‘नवा गडी नवा राज’, ‘वाटेवरती काटे गं’ यांसारख्या नाटकांमधून ती रंगभूमीवरदेखील कार्यरत राहिली. या आघाडीच्या अभिनेत्रीशी मुक्त संवाद साधण्याची संधी ‘व्हिवा लाउंज’च्या माध्यमातून मिळणार आहे.

 

  • कुठे? : महाराष्ट्र सेवा संघ, अपना बाजारजवळ, जवाहरलाल नेहरू रस्ता, मुलुंड (प.)
  • कधी? : गुरुवार, १५ डिसेंबर
  • वेळ : सायंकाळी ६ वाजता