परिसरातील भूजल प्रदूषित, श्वसनासह इतर विकाराने तीन वर्षांत सहा जणांचा मृत्यू

भाग-२

Rats in operating theaters of V N Desai Hospital
व्ही. एन. देसाई रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहांमध्ये उंदरांचा सुळसुळाट
Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
Apple CERT-In Security Alert Marathi News
लाखो iOS – Android युजर्सचा डेटा चोरी होण्याचा धोका! फोनमध्ये ‘हे’ बदल करून घ्यायचा CERT-In चा इशारा
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच

भांडेवाडीतील कचराघराला वेळोवेळी लागणाऱ्या आगीमुळे पसरणारा धूर तसेच सडलेल्या कचऱ्यातील गाळ जमिनीत झिरपत असल्याने प्रदूषित झालेले भूजल यामुळे परिसरातील वस्त्यांमधील नागरिकांना श्वसन आणि इतरही आजाराने ग्रासले असून यामुळे गेल्या तीन वर्षांत सहा जण दगावले आहेत. विशेष म्हणजे, एवढी दाहक परिस्थिती असताना प्रशासनाचे याकडे लक्ष नाही.

कचराघर आणि नागरिक वस्त्या यांच्या ५०० मीटरचा आवश्यक बफर झोन नाही. त्यामुळे कचराघरातील प्रदूषणाचा फटका वस्त्यांना बसतो. सडलेल्या कचऱ्याचा गाळ जमिनीत झिरपून या भागातील भूजल प्रदूषित झाले आहे. या परिसरातील सुमारे २ ते ३ किलो मीटर अंतरावरील विहीर, विंधन विहिरी दूषित झाल्याने त्यातील पाणी प्यायल्याने नागरिकांना पोटाचे विकार आणि चर्मरोग झाले आहेत. दिवसभर उडणाऱ्या धूलकणांमुळे श्वसनाचे विकार मोठय़ा प्रमाणात जडले आहेत, असे या वस्तीला भेट दिल्यावर दिसून येते. आगीच्या धुराची सर्वाधिक झळ वयोवृद्ध आणि लहान मुलांना बसते. विषारी धुरामुळे डोळ्यांची जळजळ होणे, झोप न येणे आदी त्रासही होतात. यासंदर्भात या भागातील डॉक्टरांना विचारले असता त्यांनी बहुतांश रुग्णांना श्वसनासंबंधित आजार आणि चर्मरोग असल्याचे सांगितले. परिसरातील चांदमारीनगर, सूरजनगर, पवनशक्तीनगर, बीडगाव या भागातही वरील प्रकारचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळून येतात. जैविक कचरा नष्ट करण्याच्या कारखान्याला लागून असलेल्या बीडगावमधील साईबाबानगरमध्ये दमा, ओकारी, हगवण, पोटदुखी, वजन आणि उंची न वाढणे, बालमृत्यू, विषमज्वर, सर्दी, खोकला, टी.बी. निमोनिया आदी आजारांचे सर्वाधिक रुग्ण आढळले. बीडगावात पाण्याचा एकमेव स्रोत विंधन विहीर आहे. येथील पाणी प्रदूषित आहे. दोन-तीन तासांनी पाणी पिवळसर होते. तसेच साठवलेल्या पाण्यावर विशिष्ट प्रकारचा थर चढतो. या भागातील डॉ. मल्हार कुळकर्णी म्हणाले की, अनेक कुटुंबातील लहान मुलांमध्ये दमा आणि निमोनिया दिसून आला आहे.

साईबाबानगरातील प्रेरणा मेश्राम यांचा बाळ जन्मताच दगावला. रिना ठाकूर यांचा मुलगा, शिल्पा बनसोड यांची सव्वा महिन्याची मुलगी दगावली. बनसोड यांचे घर आणि कचराघरातील जैव कचरा नष्ट करणारा कारखाना यातील अंतर सुमारे ५० फूट एवढे आहे. या परिसरात वायू प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या आहे. वर्षभर विशिष्ट प्रकारचा दर्प (वास) दरवळत असतो. जैव कचरा कारखान्यातील धूर साईबाबानगरात येतो, असे सामाजिक कार्यकर्ता अवंतिका लेकुरवाळे म्हणाल्या.

डॉ. शादाब के. खान यांचा गेल्या १५ वर्षांपासून चांदमारीनगरात दवाखाना आहे. ते येथे त्यांच्या म्हणण्यानुसार धूर आणि धूळ यामुळे डोकेदुखी आणि चिडचिड होणे आदी बाबी येथील नागरिकांमध्ये सामान्य झाल्या आहेत. कोरडय़ा खोकल्याचेही प्रमाण अधिक आहे. वायू प्रदूषणामुळे लहान मुलांचा सर्दी, खोकला लवकर बरा होत नाही. डोळ्यांची आग होत असल्याच्या तक्रारी असतात. अनेकांच्या डोळ्यावर सूज देखील आली आहे.

श्वसनविकाराने बाधित रुग्ण

शबाना शेख (२८ वर्षे), अर्चना गौरखेडे (३७), रेहान शेख (०८), फेज शेख (०६), पूनम नंदेश्वर (०४), सोनम नंदेश्वर (०७), अथर्व डहाके (१० महिने), सरिता ठाकरे (३५), अमिरकाबाई लहरे (४०), जयश्री मेश्राम (४५)

गेल्या तीन वर्षांत बीडगाव, सूरजनगरातील मृत्यू

ऋतूजा मेश्राम (६ वर्षे), साईबाबानगर (बीडगाव), नीलेश बनसोड यांची सव्वा महिन्याची मुलगी दगावली. प्रेरणा मेश्राम यांचा मुलगा, रिना ठाकूर यांचा १५ दिवसांचा मुलगा, जगदीश कुकडे (४३), सूरजनगर, बबनराव बागडे (५०)