विरोधकांना अनेक धक्के देणारे आणि गरजूंना मदतीचा हात पुढे करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोटार सोमवारी दुपारी नागपूर विमानतळाजवळ अचानक खराब झाली. यानंतर बंद पडलेली मोटार चालू करण्याचे प्रयत्न सुरु झाले. बंद पडलेली गाडी चालू करण्याच्या कामात खुद्द मुख्यमंत्र्यांनी मदतीचा हात दिला आणि त्यांनी बंद पडलेल्या गाडीस धक्का द्यायला सुरुवात केली. परंतु, गाडी काही केल्या सुरू झाली नाही. गाडी सुरु होत नाही म्हटल्यावर मुख्यमंत्री अन्य गाडीत बसून विमानतळाकडे रवाना झाले. ते नागपूरहून दिल्लीला जात होते.

devendra-fadnavis-2
devendra-fadnavis