स्थलांतरित ‘बली’ वाघ जगप्रसिद्ध ‘जय’चा छावा

उमरेड-करांडला अभयारण्यातील ‘बली’ नावाच्या वाघाने सुमारे १५० किलोमीटरहून अधिक एरियल अंतर पार करत मानसिंगदेव अभयारण्य गाठले. व्याघ्रप्रेमी आणि अभ्यासक पर्यटकांमुळे लांब पल्ल्याचे वाघाचे स्थलांतरण शुक्रवारी उघडकीस आले. काही महिन्यांपूर्वीच कळमेश्वर-कोंढाळीच्या राखीव जंगलातील वाघाने तब्बल १०० ते १२० किलोमीटरचे एरियल अंतर पार करत अमरावती जिल्ह्यातील पोहरा-मालखेडच्या राखीव जंगलात स्थलांतरण केले होते.

Another 18-hour power cut in Ghansoli village
घणसोली गावात पुन्हा १८ तास वीजविघ्न
Swimmer dies after drowning in lake
नागपूर : धक्कादायक! पोहण्यात तरबेज तरूणाचा तलावात बुडून मृत्यू
youth murder
वसई : अपघात नव्हे ही तर हत्या, ३ वर्षांनी हत्येला फुटली वाचा
Cattle fodder was burnt due to fire in Deola taluka
देवळा तालुक्यात आगीमुळे गुरांचा चारा खाक, टंचाईत शेतकऱ्याला फटका

स्थलांतरित झालेला ‘बली’ हा वाघ एक वर्षांहून अधिक काळापासून बेपत्ता असलेल्या उमरेड-करांडला अभयारण्यातील जगप्रसिद्ध ‘जय’चा छावा आहे. उमरेड-करांडला अभयारण्यातील वाघांची संख्या झपाटय़ाने कमी होत असून येथून वाघ नाहीसे होत आहेत. ‘जय’चे काय झाले हे कुणालाही ठाऊक नाही तर ‘श्रीनिवास’ वाघाचा मृत्यू उघडकीस आला. ‘जय’ पासून झालेले पिल्ले बेपत्ता असून शुक्रवारी व्याघ्रप्रेमी डॉ. मोहम्मद शाहरिक या पर्यटकामुळे ‘बली’ या वाघाचे स्थलांतरण उघडकीस आले.

डॉ. शाहरिक यांनी वाघाची छायाचित्रे व्याघ्रप्रेमी आणि अभ्यासक विनीत अरोरा आणि जुनेद शेख यांना पाठवल्यानंतर त्यांना हा वाघ ‘जय’चा छावा ‘बली’ असल्याचा संशय आला. त्यानंतर त्यांनी ‘बली’चे आधीचे फोटो आणि डॉ. शाहरिक यांनी पाठवलेल्या छायाचित्रातील वाघाच्या अंगावरील पट्टे जुळवून पाहिल्यानंतर तो ‘बली’ असण्यावर शिक्कामोर्तब झाले. विशेष म्हणजे उमरेड-करांडला अभयारण्यातील वन्यजीव प्रशासनाला त्यांच्या अभयारण्यातून वाघ बेपत्ता असल्याची माहिती नाही. तर मानसिंगदेव अभयारण्याच्या वन्यजीव प्रशासनालासद्धा त्यांच्या अभयारण्यात एका नव्या वाघाने प्रवेश केल्याची माहिती नाही. सुरेवाणी खाप्याकडे डॉ. मोहम्मद शाहरिक यांना हा वाघ दिसला आणि त्यानंतर वाघाचे लांब पल्ल्याचे स्थलांतरण उघडकीस आले.