कारागृहात असतानाही आपल्या कारवायांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या शहरातील कुप्रसिद्ध शाबीर नासीर पठाण उर्फ मोठा पठाण आणि समीर नासीर पठाण या भावांनी शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास कारागृह कर्मचा-यांना मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पठाण बंधू टिप्पर गँगचे म्होरके आहेत. शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास हे दोघे तुरुंगात रेडीओ ऐकत होते. त्यावेळी तुकाराम बोरसे या कैद्याने चॅनेल बदलल्याने आलेल्या रागातून या दोघांनी तुकारामला मारहाण करण्यास सुरवात केली. ही मारहाण सुरु असताना बिस्मिल्ला शबीर तडवी हा कारागृह शिपाई व महेंद्र पगार हे कर्मचारी भांडण सोडवण्यासाठी गेले असता या पठाण बंधूनी या दोघांनाही मारहाण केली. या दोघांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ajit pawar ncp s mla, dilip mohite, collector office, amol kolhe, nomination form, shirur lok sabha constituency, lok sabha 2024, election 2024, shirur news, politics news, pune news,
खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या ‘टायमिंग’मुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Sanjay Singh alleges that Arvind Kejriwal is not allowed to meet his family face to face
केजरीवाल यांचे नीतिधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न! कुटुंबीयांना समोरासमोर भेटू दिले जात नसल्याचा संजय सिंह यांचा आरोप
Why did Nitin Gadkari say that blockade the forest officials in Gadchiroli
“वनविभाग ‘झारीतील शुक्राचार्य’; त्यांच्या अधिकाऱ्यांना घेराव घाला”, नितीन गडकरी गडचिरोलीत असे का म्हणाले…
MP Dhairyashil Mane should be in Delhi when Narendra Modi takes oath for the third time says Suresh Halvankar
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेताना खासदार माने दिल्लीत हवेतच- सुरेश हाळवणकर

टिप्पर गँग पूर्वइतिहास

टिप्पर गँग ही नाशिकमधील कुप्रसिद्ध गुंडांची गँग आहे. शाबीर नासीर पठाण हा या गँगचा म्होरक्या. समीर पठाण हा त्याचा सख्खा भाऊ असून या दोघांवर लुटमार, प्राणघातक हल्ले, खंडणी आदी गुन्हे दाखल आहेत. दोघे बंधू  त्यांच्या गँगमधील इतर सदस्य यांनी गेल्या ८-१० वर्षापासून नाशिकच्या सिडको परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. काही वर्षांपूर्वी सिडकोत झालेल्या मोटारसायकलच्या जाळपोळीमागे या टिप्पर गँगचा हात होता. हे दोघे बंधू सध्या नाशिक मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असून कारागृहातही त्यांनी अशा प्रकारची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला असल्याचे या प्रकारावरून दिसून येते.