नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागामार्फत बुधवारी ऐरोली व वाशी विभाग क्षेत्रात दुकानाबाहेरील मार्जिनल स्पेसच्या अनधिकृत वापरावर ठोस कारवाई करण्यात आली. त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार पालिका क्षेत्रात धडक मोहिमा राबविल्या जात आहेत. अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. अमरीश पटनिगीरे यांच्या नियंत्रणाखाली विभाग अधिकारी कारवाई करत आहे. बुधवारी करण्यात आलेल्या कावाईत वाशी सेक्टर ३०मधील वाढीव बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई
Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
Thane municipal corporation, commissioner, action against illegal construction, Thane
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर हातोडा
Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा

यामध्ये रिअल टेक पार्कमधील ३, हावरे मॉलमधील ३, शांती सेंटरमधील १, सेंचुरियन मॉलमधील ४ अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.

अशाच प्रकारे ऐरोली विभागात साहाय्यक आयुक्त व विभाग अधिकारी तुषार बाबर यांनी अभियंता नीलेश मोरे व सहकाऱ्यांसह ऐरोली सेक्टर ९ व दिवा गावातील खाद्य पदार्थाच्या अनधिकृत ढाब्यावर कायदेशीर कारवाई केली.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सर्वच विभाग कार्यालयांद्वारे अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात धडक मोहीम राबविली जात आहे. मार्जिनल स्पेसचा अनधिकृत वापर करणाऱ्यांविरोधातही कठोर कारवाई करण्यात येत आहे.