लंडनचे हाईड पार्क, खोपोलीतील इमॅजिकाच्या धर्तीवर विकास; ४०० कोटींचा खर्च

लंडन येथील ‘हाईड पार्क’, मुंबई येथील ’एस्सेल वर्ल्ड’ आणि खोपोली येथील ‘इमॅजिका’ यांच्या तोडीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मनोरंजन क्षेत्र खारघरमधील सेंट्रल पार्क व उर्वरित जमिनीवर उभारण्यासाठी सिडको प्रशासन सज्ज झाले आहे. वर्षभरापासून सेंट्रल पार्कच्या उर्वरित मोकळ्या जमिनीवर कोणते उद्यान बांधावे यासाठी सिडकोच्या अभियंत्याचा एक गट काम करीत होता. या कामाचा अंतिम टप्पा पार पडला आहे.

thane, traffic route changes marathi news, namo central park marathi news
नमो सेंट्रल पार्क परिसरात मोठे वाहतूक बदल; शनिवार, रविवार या दिवशीच लागू असणार बदल, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना
Single airline monopoly Nagpur
नागपूर-मुंबईदरम्यान एकाच विमान कंपनीची मक्तेदारी; प्रवासी त्रस्त, कंपनी…
coast guard recruitment indian coast guard recruitment 2024
नोकरीची संधी : नाविक पदांची भरती
PM Modi launches development initiatives worth over Rs. 32,000 crore in Jammu and Kashmir
जम्मू-काश्मीर प्रगतिपथावर,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही; ‘आयआयटी मुंबई’च्या रिसर्च पार्कचे उद्घाटन

सुमारे १०० एकर जागेवर हे क्षेत्र स्थापित करण्यासाठी देशभरातील नामांकित विकासक कंपन्यांना मार्चमध्ये आवाहन करण्यात येणार आहे. या मनोरंजन क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे आकर्षण ‘रोलर कोस्टर स्लाईड’ (मोठय़ा वर्तुळाकार घसरगुंडय़ांवरून चालणाऱ्या भरधाव गाडय़ा) हे असणार आहे. यासाठी सुमारे ४०० कोटी रुपये खर्च अंदाजित असल्याचे सांगण्यात येते. हा खर्च विकासक करणार असून बांधा-वापरा व हस्तांतरित करा तत्त्वावर हा प्रकल्प उभारला जाणार आहे.

खारघरवासीयांची यापूर्वीची ओळख सेंट्रल पार्क हे उद्यान अशी होती. आजही ३९ एकर जमिनीवर विकसित केलेल्या या उद्यानामध्ये खारघरच नव्हे तर पनवेल परिसरातील रहिवासीही येतात. १०० कोटी रुपये खर्च करून सुरू केलेले हे उद्यान २०१० साली नागरिकांसाठी खुले करण्यात आले. सिडको आजही त्याच्या देखभालीसाठी वर्षांला दोन कोटी रुपये खर्च करते. सेंट्रल पार्कच्या मागील जमीन ओसाड पडली आहे. या जमिनीवर सेंट्रल पार्कप्रमाणेच उद्यान विकसित करण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सिडकोने नागरिकांच्या विरंगुळ्याचा विचार करून आंतरराष्ट्रीय दर्जाची मनोरंजन साधने या परिसरात उभी करण्याचा विचार केला आहे. सिडकोच्या नियोजन विभागाने व अभियांत्रिकी विभागाने यासाठी पुढाकार घेतला आहे.

हल्ली पालक मुलांना सुटीत परदेशात नेतात. तिथे असतात तशी मनोरंजन साधने नवी मुंबई परिसरात असावीत म्हणून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या मनोरंजन क्षेत्रामध्ये वॉटरपार्क, मोठय़ा घसरगुंडय़ा, उपाहारगृह, क्लबहाऊस उभारण्यात येणार आहे.

सुमारे ४०० कोटी रुपयांचा अंदाजित खर्च या सर्व विकासकामांना येणार असल्याने ज्या कंपनीची पात्रता १०० कोटी रुपयांच्या उत्पन्नाची आहे, अशाच कंपन्या या कंत्राटाच्या निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतील, अशीही अट सिडकोने घातली आहे. संबंधित कंत्राटदाराला या मनोरंजन क्षेत्राची देखभाल करावी लागेल. विकासासाठी झालेला खर्च वसूल करण्यासाठी मनोरंजन क्षेत्रामधील प्रवेश शुल्क, हॉटेल व क्लबहाऊस चालविण्याचे अधिकार त्याला देण्यात येतील. मुंबई व उपनगरांतून येणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन येथे मोठय़ा क्षमतेचे वाहनतळ उभारण्यात येणार आहे. हा अंदाजित आराखडा सिडको प्रशासनाने बनविला असला, तरी देशभरातील व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांनी यामध्ये सहभागी होत या प्रस्तावापेक्षा अधिक कल्पक प्रस्ताव सिडकोला बनवून द्यावा, यासाठी सिडको प्रशासन मार्चपर्यंत निविदा जाहीर करणार असल्याचे सिडकोचे कार्यकारी अभियंता आर. एम. कुशाळकर यांनी सांगितले. सध्या सिडकोने बनविलेल्या प्रस्तावासाठी मढव कन्सलन्टट आणि दाराव कन्सलन्टटने साहाय्य केले आहे.

  • सुमारे १०० एकर जागेवर विकसित करण्यात येईल.
  • परदेशातील मनोरंजन उद्यानांसारख्या सुविधा देण्यात येतील.
  • वॉटरपार्क, मोठय़ा घसरगुंडय़ा, उपाहारगृह, क्लबहाऊस उभारण्यात येईल.
  • मुंबई व उपनगरांतून येणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन येथे मोठय़ा क्षमतेचे वाहनतळ उभारण्यात यईल.